जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्तीला भेटवस्तू द्याल. गरजेच्या कामात अधिक वेळ घालवा. आपल्या आवडत्या गोष्टी कराव्यात. नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळेल.
वृषभ :-
मनात आशेचा नवीन किरण उठेल. आर्थिक बाबतीत घरच्यांचा सल्ला मिळेल. जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आवडत्या वस्तूंची खरेदी करता येईल. मनात उगाचच नसती काळजी उत्पन्न होऊ देऊ नका.
मिथुन :-
आर्थिक प्रश्न सुटतील. मात्र त्याबरोबर खर्च देखील वाढेल. कौटुंबिक जबाबदार्या वाढतील. उदासवाणी मनस्थिती दूर करता येईल. काही प्रश्न चर्चेतून सुटू शकतील.
कर्क :-
आर्थिक बाबतीत आपण सतर्क राहाल. कामाची घाई-गडबड राहील. त्यामुळे अधिक वेगाने कामे पूर्ण करावी लागतील. अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. मानसिक स्थिरता जपावी.
सिंह :-
अपेक्षित असा व्यावसायिक लाभ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. आरोग्यात सुधारणा संभवते. मानसिक समाधान लाभेल. कलागुणांना वाव द्यावा.
कन्या :-
तडजोडीला पर्याय नाही हे ध्यानात घ्यावे. मनातील वादळ शांत करण्याचा प्रयत्न करावा. अतिविचार करणे योग्य नाही. प्रगल्भ विचार करण्याची गरज भासेल. द्विधा मनस्थितीतून बाहेर पडावे लागेल.
तूळ :-
क्षुल्लक गोष्टीवर अडून राहू नका. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. ओळखीतून कामे होण्याची शक्यता. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. अपयशाने खचून जाऊ नका.
वृश्चिक :-
हातातील कामात मनाजोगे यश येईल. सहकारी तुम्हाला वेळेवर मदत करतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. अपेक्षित लाभाने खुश व्हाल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल
धनू :-
कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढाल. मुलांबरोबर खेळीमेळीने वागाल. आपला आनंद आपणच शोधावा. जुन्या गोष्टी फार मनावर घेऊ नका. नातेवाईकांशी मतभेद वाढवू नका.
मकर :-
साहसाने कामात हात घाला. प्रवास जपून करावा. नवीन उद्दीष्ट सावधपणे हाताळा. अकारण आलेली निराशा झटकून टाका. कौटुंबिक कामात मन रमेल
कुंभ :-
वादाचे मुद्दे फार ताणू नका. आर्थिक बाबतीत अतिशय सतर्क राहावे. योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका. अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
मीन :-
मानसिक उत्साह वाढेल. आज कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. इतरांना आपले मत मान्य करायला लावाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. अधिक जोमाने कामे कराल.
हेही वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






