शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील दुदैवी घटना, पालकमंत्र्यांनी केली जखमीची आस्थेवाईकपणे चौकशी. जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार-ना. गिरीष महाजन
धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला.
या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली.
एक कंटेनर महामार्गावरुन जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या भीषण अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.
अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. कंटनर हॉटेलमध्ये शिरल्यानं अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे.
या अपघातात 12 व्यक्तींचा मृत्यु झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 17 जण येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर 3 जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या जखमींची आज संध्याकाळी राज्याचे ग्रामविकास पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली. पळासनेर येथे कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने आज सकाळी अपघात झाला आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वाहनचालक, क्लिनरसह शाळकरी मुलांचाही समावेश असून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासनामार्फत उपचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार असून या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी त्यांचेसमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अशि्वनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ अरुण मोर्य, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, अनुप अग्रवाल आदि उपस्थित होते.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक