रोज सकाळी भिजवलेले चणे खाण्याचे ५ फायदे; आजार आसपासही भटकणार नाहीत

Spread the love

Benefits Of Consuming Soaked Black Chana : रोज भिजवलेले चणे खाल्ल्यास बरेच फायदे मिळतात. भिजवलेले चणे खाल्ल्यानं तब्येत कायम निरोगी राहते.

काळ्या चणे लोक भाजीत खातात तर कोणी दाळीत याचा समावेश करतं. काहीजण चणे भाजूनही खातात तर काहीजण उकळवून. भिजवलेले चणे खाणं तब्येतीसाठी फायदेशीर ठरतं. चण्यांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, एनर्जी, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसे, जिंक, कॉपर, व्हिटामी बी-३ आणि सोडियम सारखे पोषक तत्व असतात.

याव्यतिरिक्त त्यात एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी बॅक्टेरियल आणि एंटी फंगल गुणही असतात. (Expert Shares Benefits Of Consuming Soaked Kale Chane Or Chickpeas) रोज भिजवलेले चणे खाल्ल्यास बरेच फायदे मिळतात. भिजवलेले चणे खाल्ल्यानं तब्येत कायम निरोगी राहते. याशिवाय भिजवलेल्या चण्यांचे पाणी प्यायल्यानेही तब्येतीला पुरेपूर फायदे मिळतात.

१) पचन सुधारते

Pic for Google

भिजवलेले चणे पचन चांगलं ठेवण्यास फायदेशीर ठरतात. चण्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतडे आणि पोटातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि तुमचे शरीरही डिटॉक्स होते. पोटाशी संबंधित समस्यांही दूर होतात. जर तुम्हाला गॅस, अपचन यांसबंधीत कोणताही समस्या असतील तर चण्यांचे सेवन करायला हवे. पोटॅशियम, फॉलेट आणि मॅग्नेशियम हृदयासाठी हृदयासाठी चांगले असते.

२) वजन कमी करण्यास मदत होते

Pic for Google

रोज रिकाम्यापोटी भिजवलेल्या चण्यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. चण्यांमध्ये फायबर्सचे प्रमाण अधिक असते. तुम्ही रोज भिजवलेले चणे खाल्ल्यास तुम्हाला दीर्घकाळ भूक लागणार नाही. याव्यतिरिक्त तुम्ही ओव्हर इटिंग करणं थांबवू शकता. वजन नियंत्रणात राहण्यासाठी भिजवलेले चणे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. यामुळे तुमची सतत खाण्याची इच्छा कमी होईल.

४) कोलस्टेरॉल नियंत्रणात राहतं

Pic for Google

कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी भिजवलेल्या चण्यांचे सेवन उत्तम ठरते. काळ्या चण्यांमध्ये फायबर्स जास्त असतात. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. भिजवलेले चणे खाल्ल्यानं कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते. तुमच्या शरीरात कॉलेस्टेरॉल जास्त असेल तर तेलात तळेले पदार्थ खाणं टाळायला हवं.

५) रक्ताची कमतरता दूर होते

Pic for Google

चण्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही रोज भिजवलेले चणे खाल्ले तर शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. कारण चण्यांमध्ये आयर्न अधिक असते. आयर्न रेड ब्लड सेल्सचे उत्पादन वाढवते. त्यामुळे हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो आणि रक्ताची कमतरता दूर होते. दिवसभर उत्साही वाटतं.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार