भर रस्त्यावरील मोबाईलचे दुकान फोडल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण,चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल-येथील शेतकरी सहकारी संघाच्या व्यापार संकुलात असलेल्या मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे २लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.म्हसावद रस्त्यावर जुन्या पोलीस स्थानकासमोर असलेल्या प्रमुख मार्गावरील दुकान फोडून चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेरावर फडके टाकून झाकला होता तर दुकानामध्ये असलेल्या कॅमेराच्या सर्व वायरी तोडून टाकल्या आहेत.
याबाबत माहिती अशी,की जुन्या पोलीस स्थानकासमोर एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघाचे व्यापार संकुल असून याठिकाणी अनेक व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत.काल रात्री सात वाजेच्या सुमारास व्यापार संकुलातील हरीओम एंटरप्राईजेसचे संचालक गोपाल दांडगे यांनी दुकानाच्या पत्री शटरला कुलूप लाऊन ते घरी गेले.दुकानात साठ नवीन मोबाईल,अन्य साहित्य व तीन हजार रुपये रोख रक्कम होती.आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दुकानाचे मालक गोपाल दांडगे हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या शटरला कुलूप नसल्याचे दिसून आले.
गोपाल दांडगे यांनी शेजारी असलेले दुकानदार योगेश पाटील यांना दुकानास कुलूप नसल्याचे सांगितले.गोपाल दांडगे व योगेश पाटील यांनी दुकानाचे पत्री शेड वर करून दुकानात गेले असता त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला तसेच दुकानातील नवीन मोबाईल देखील आढळून आले नाहीत.दुकानात असलेली सुमारे तीन हजार रुपयांची रोख रक्कम देखील आढळून आली नाही.गोपाल दांडगे यांनी सर्व मोबाईलची मोजणी केली असता त्यांना दुकानातील विविध कंपन्यांचे १९ मोबाईल व रोख तीन हजार रुपये
अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले.
विशेष म्हणजे दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असून अज्ञात चोरट्यांनी बाहेरच्या कॅमेरावर फडके टाकून तो झाकून ठेवला तर दुकानातील कॅमेराच्या वायरी तोडल्या होत्या.याबाबत गोपाल दांडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार सुनील लोहार,अनिल पाटील व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.चोरट्यांनी भर रस्त्यावरील मोबाईलचे दुकान फोडल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक