पती बाहेरगावी गेल्याने विवाहितेचा घरात घुसून केला बलात्कार, तिच्या अश्लील व्हिडिओ बनवून केले ब्लॅकमेल अन् सतत……

Spread the love

अमेठी :- (उत्तर प्रदेश) मध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहनगंज कोतवाली परिसरातील गावातील ही घटना आहे. या बाबत माहिती अशी की उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये एका महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.मोहनगंज कोतवाली परिसरातील गावातील ही घटना आहे. गावातील एका तरुणाने घरात घुसून विवाहितेवर बलात्कार केला आणि तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला. व्हिडिओच्या आधारे आरोपी पीडितेला सतत ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करत होता.

पीडितेच्या वक्तव्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ जून रोजी घडली. पीडितेचा पती गावाबाहेर गेला होता. हा प्रकार कळताच आरोपी तरुण महिलेच्या घरी पोहोचला आणि तिचा विनयभंग करू लागला. विवाहितेने विरोध केला असता तरुणाने जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओचा धाक दाखवून आरोपीने महिलेवर बलात्कार केला.

यानंतर तो महिलेला ब्लॅकमेल करत होता. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ डिलीट न केल्यावर पीडितेने हा प्रकार पती आणि कुटुंबीयांना सांगितला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पीडितेने मोहनगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तिलोई कार्यक्षेत्र अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. तब्बल महिनाभरानंतर हे प्रकरण पोलिसांच्या हाती आले आहे. पीडितेचा तहरीर मिळाला असून, चौकशीनंतर संपूर्ण प्रकरणाची एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे पण वाचा

टीम झुंजार