बरेली (उत्तर प्रदेश):- जिल्ह्यात आणखी एक हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणी अज्ञात लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायची. यानंतर ती ब्लॅकमेल करायची.
अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग करुन या तरुणीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आता बरेली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात हनी ट्रॅप टोळीने अनेक इन्स्पेक्टर आणि राजकारण्यांनाही आपले शिकार बनवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
दरम्यान, तरुणी आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायची. त्यानंतर ती तरुणांना मित्र म्हणून निर्जन ठिकाणी बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असे. यादरम्यान, तिचा मित्र मोबाईलवरुन व्हिडिओ बनवत असे. त्यानंतर त्यांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरु करायची. तरुणीने आतापर्यंत 3 जणांना आपला बळी बनवले आहे. तसेच एका तरुणाकडून पैसे आणि मोटारसायकल हिसकावून घेतली. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल होताच या प्रकरणाचा तपास सुरु झाला. तरुणीला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले. त्याचवेळी पोलिस तरुणीच्या मित्राचा शोध घेत आहेत.
अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करायची……
बरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितले की, सीबीगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी पूनम मौर्या तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे. त्यानंतर ती तरुणांना अश्लील फोटो पाठवायची. यानंतर ती त्यांना निर्जन ठिकाणी बोलावून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असे. यादरम्यान, तिचा मित्र दिलशाद फोटो आणि व्हिडिओ बनवायचा.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची……
दुसरीकडे, पीडिताला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून पोलिसात तक्रार करण्याची धमकी देण्यात आली. यासोबतच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. तरुणी 50 हजार ते एक लाख रुपये मागायची. पैसे न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची. अशाप्रकारे अतापर्यंत या तरुणीने 3 जणांना आपला बळी बनवले आहे.
पोलिस तरुणीचा मित्र दिलशादचा शोध घेत आहेत…..
याप्रकरणी एका तरुणाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरुणी आणि तिच्या मित्राने मोटारसायकल, मोबाईल आणि पैसे घेऊन गेल्याचा आरोप त्याने केला. त्यानंतरही त्याला ब्लॅकमेल केले जात आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी आणखी काही लोकांनी बरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तरुणीला अटक करुन कारागृहात पाठवले. तर पोलिस आता तिच्यासोबत राहणाऱ्या दिलशादचा शोध घेत आहेत.
यापूर्वी पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला होता…..
काही दिवसांपूर्वी शहरातील बारादरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश झाला होता. ही टोळी बरेली आणि इतर जिल्ह्यातील पोलिस, राजकारणी आणि व्यापारी यांना आपला शिकार बनवत असे. ती मोबाईलद्वारे लोकांना घरी बोलावून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत असे. एक पोलिस उपनिरीक्षकही तिचा बळी ठरला आहे. पोलिसांनी या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करुन गुन्हा दाखल केला आहे. सध्या टोळीचा म्होरक्यासह अन्य आरोपी फरार आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.