मुंबई : पश्चिमी रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागातील अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार 26 जुलै 2023 आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 27 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती अपरेंटिस {फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)}. एकूण जागा – 362.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एकूण किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच NCVT/SCVT शी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेमधून संबंधित पदांनुसार ITI प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक……. Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
या जागांसाठी भरती..,..
अपरेंटिस {फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)}. एकूण जागा – 3624
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकवर क्लिक करा.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






