एरंडोल- तालुक्यातील पदमालय हे अतिप्राचीन देवस्थानासह पुरातन मंदिर म्हणून प्रसिध्द आहे. खान्देशातील गणपतीचे अर्धेपीठ असलेले देवस्थान आहे. येथे भीमकुंड देखील भाविकांसाठी आकर्षणाचे पर्यटन स्थळ आहे. या देवस्थानात अमोद आणि प्रमोद डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती असून जगातील एकमेव मंदिर मानले जाते. येथे लाखो भाविक भक्त दर्शनासाठी व पर्यटनासाठी येत असतात. येथील परिसर अगदी निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची नेहमीच गर्दी पहावयास मिळते.
येथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होऊन या मंदिराचा पर्यटन विकास व्हावा यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने प्रयत्नशील होते. त्यासाठी गत काळात आमदार चिमणराव पाटील यांनी योग्य त्या पाठपुराव्याने ५ कोटींचा इतका निधी देखील आणल आहे. परंतु या मंदिराच्या विकासासाठी क्षेत्र मोठे असल्याने निधी अपूर्ण पडत असल्याने या मंदिर पर्यटनाचा पुरेसा विकास होवू शकला नाही. यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
त्यास अखेर यश मिळाले असून पदमालय देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंदिर परिसरात आगामी ५ वर्षांत वन विभागाच्या पाच एकर जमिनीवर १० कोटी ९३ लाखांच्या निधीतून अष्टविनायक थीम पार्कसह विविध उद्यानांचा समावेश असलेले वनोद्यान साकारण्यात येणार आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्या सूचनेनुसार वन विभागाने याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला निसर्ग पर्यटन विकास मंडळाने तत्वतः मंजुरी दिली आहे.
या वनोद्यानामुळे आगामी काळात या मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. जळगांव शहरातील आरेखक शिरीष बर्वे यांनी या वनोद्यानाचे संकल्प चित्र साकारले आहे. उपवनसंरक्षक कार्यालयाकडून पदमालय देवस्थान परिसरात वनोद्यानाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या वनोद्यानामध्ये अॅम्पी थिएटरचाही समावेश असून नक्षत्र वन, गुलाबांचे उद्यान, निवडुंग उद्यान, फुलांचे उद्यान तसेच दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येईल. फुलपाखरू उद्यानात अॅम्पी थिएटर, पेव्हिंग ब्लॉक आणि पॅथवे, प्रवेशद्वार, ऑफिस युनिट, पाण्याची टाकी पिण्याच्या पाण्याचीही सुविधा राहील.
मेडिकल गार्डनमध्ये अष्टविनायक थीम पार्क असेल तर वनस्पती उद्यानात इंटरप्रिटेषण सेंटरची इमारत राहील. या नुसार या देवस्थानाचा विकास होणार आहे. पर्यटन प्रेमींकडून आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले जात असून यासाठी सहकार्य केलेल्या वन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे आमदार चिमणराव पाटील यांनी आभार मानले आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक