जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.
वृषभ :-
दिवस आनंदात जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीतून पहाल. गायन कलेला वेळ द्यावा.
मिथुन :-
धाडसाने कामे हाती घ्याल. ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आळा. घाला.
कर्क :-
समोरच्या व्यक्तीला गृहीत धरू नका. इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
सिंह :-
प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल.
कन्या :-
सकारात्मक उर्जेने काम करावे. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी वेळ द्यावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका.
तूळ :-
मनातील विचारांनी गांगरून जाऊ नका. उजळ बाजू लक्षात घेऊन वागावे. कमी श्रमातून मिळणार्या फायद्याकडे तुमचा कल राहील. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात.
वृश्चिक :-
जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्या कोणाला घेऊ देऊ नका.
धनू :-
अडचणींवर हसत-हसत मात करावी. केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल.
मकर :-
कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका. भागीदारीत धोरण आधीच पक्के करावे. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे.
कुंभ :-
घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा. तिखट व तामसी पदार्थ खाल. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
मीन :-
स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल.
हेही वाचलंत का ?
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..