रावेर तालुक्यात पावसाचे थैमान,माजी उपनगराध्यक्ष सह दोघे नागझिरी नदीत वाहून गेले, दोघांचे मृतदेह सापडले, माजी उपनगराध्यक्षच्या शोध सुरू.

Spread the love

रावेर :- तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. या पुरात माजी नगरसेवकासह तीन वृद्ध वाहून गेले. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे प्रशासनाला बचावकार्य करावे लागले.
पुराचे पाणी ओसरल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी शेख इक्बाल शेख सत्तार कुरेशी (55), बाबुराव बारेला (50) यांचा मृतदेह बाहेर काढला. तर माजी नगरसेवक सुधीर गोपाल पाटील यांचा शोध सुरू आहे.

रावेर शहरात व परिसरात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. रावेर शहरातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. रात्री पावसामुळे भिंत कोसळून नागझिरा चौकात शेख इक्बाल यांचा मृत्यू झाला. तर मोरव्हाल नदीला आलेल्या पुरात बाबुराव बारेला हे वाहून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर गुरुवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापनाने बचावकार्य हाती घेतले. यादरम्यान शेख इक्बाल आणि बाबुराव बारेला यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

तर रावेर शहरातील माजी नगरसेवक सुधीर पाटील हे त्यांच्या जुना सावदा रोडवरील वाडय़ातून भगवतीनगरातील बंगल्याकडे रात्री दुचाकीने निघाले होते. यावेळी रसलपूर-खिरोदाकडून येणाऱया नागझिरी नाल्याच्या पुलातील पाण्यात सुधीर पाटील यांनी दुचाकी टाकली. यावेळी अचानक आलेल्या पुराच्या लोंढय़ाने सुधीर पाटील दुचाकीसह घसरून पडले. रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, रात्री पाटील यांचा शोध न लागल्यामुळे शोधकार्याला सुरुवात केली. सकाळी शोधकार्यादरम्यान पाटील यांची दुचाकी आढळली.

हे पण वाचा

टीम झुंजार