Viral Video: नागालँडमधील राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये वाहनांवर दगड पडताना दिसत असून, त्यामुळे वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.
पावसामुळे अनेक ठिकाणी इमारत कोसळण्याच्या, दरड कोसळण्याच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना नागालँडमध्ये घ़़डली आहे. पावसामुळे महामार्गावर दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झालाअसून तीन जण गंभीर जखमी झाले. आहे.
येथे भूस्खलना दरम्यान एक महाकाय दगड रस्त्यावरील कारवर पडल्याने क्षणात कारचा चुरा झाला. आणि कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.राष्ट्रीय महामार्ग 29 वर दरड कोसळल्याचा एक भयावह व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग 29 वर ही दरड कोसळली. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांवर काही दगड पडल्याने काही क्षणातच वाहनाचा चुरा झाला.
यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय अडकलेल्या कारमध्ये एक व्यक्ती अडकला होता. त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाडीच्या आत बसवलेल्या डॅश कॅममध्ये या संपूर्ण घटनेची नोंद झाली.या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून महामार्गावर काही वाहने उभी असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
अचानक रस्त्यावर वरून मोठे दगड पडतात. एक दगड एवढा मोठा होता की तो कारवर पडल्यानंतर कारचा पुर्ण चुरा झाल, तर दुसरी कार त्या दगडाला आदळल्याने उलटली. दुसरीकडे, दुसऱ्या दगडामुळे पुढे उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान होते.
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी सांगितले की, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जखमींवर शक्य ते सर्व उपचार केले जात आहेत.
यावेळी देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलनाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. केदारनाथ यात्राही दरड कोसळल्यामुळे वारंवार थांबवावी लागत आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगसारख्या डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.