Health Tips : बाजारातून आणलेली कोथिंबीर खुडून ठेवताना त्यावरील फुलं तुम्ही फेकून देता का किंवा ती खायची की नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडतो का? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात.
Health Tips : भेळ किंवा कोणतीही भाजी हे सगळे पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्णच वाटतात. पदार्थांना चविष्ट करण्यासोबतच अनेक पोषणद्रव्ये कोथिंबिरीमध्ये असतात. पण बाजारातून आणलेली कोथिंबीर खुडून ठेवताना त्यावरील फुलं तुम्ही फेकून देता का किंवा ती खायची की नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडतो का? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात.
- कोथिंबिरीची फुलं खाण्यासाठी सुरक्षित असतात. त्याला विशिष्ट आणि तीव्र गंध असतो. झणझणीत पदार्थांमधील तिखटाचा त्रास होऊ नये म्हणून कोथिंबिर फायदेशीर ठरते. यामुळे थंडावा निर्माण होण्यास मदत होते.
- कोथिंबिरीच्या फुलांमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. कोथिंबिरीच्या पानांप्रमाणेच त्यांच्या फुलांमध्येही डाएटरी फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, असतात. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन के ब्लड क्लोटींग करण्यास तसेच हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात.
- कोथिंबिरीच्या फुलांमुळे पचनक्रिया सुधारते. तसेच पानांसोबत फुलंदेखील खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधूमेहींच्या आहारात त्याचा वापर करणे हितकारी ठरते. जेवण तयार झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फुलं यांची सजावट करा. यामुळे तुमचा पदार्थ अधिक चविष्ट आणि आरोग्यदायी होण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
हे वाचलंत का ?
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..