शहरातील मोकाट डुकरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करा. माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांची मागणी.

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी :- शहरासह नविन वसाहतींमध्ये मोकाट फिरणा-या डुकरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण
झाले असून पालिकेने मोकाट फिरणारे डुकरे व कुत्रांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी पालिकेच्या मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मोकाट डुकरे घरात व धार्मिक ठिकाणी फिरत असल्यामुळे वाद होण्याची भीती असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की शहरात मोकाट फिरणा-या डुकरांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून मोकाट डुकरे घरांमध्ये घुसत असल्यामुळे महिला व लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच मोकाट फिरणारे डुकरे मंदिरामध्ये घुसत असल्यामुळे धार्मिक वादविवाद होण्याची भीती आहे.डुकरे धार्मिक
स्थळांच्या परिसरात फिरत असल्यामुळे धार्मिक भावना दुखावून शहरातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे.

तसेच शहरात फिरणारे अनेक डुकरे गंभीर
जखमी व आजारी असल्यामुळे विविध आजारांची लागण होण्याची भीती असून नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची आहे.याबाबत पालिका
प्रशासनाने त्वरित दखल घेवून शहरात फिरणा-या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन
यांनी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार