एरंडोल l प्रतिनिधी :- बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज
मध्यरात्रीच्या सुमारास गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मी नगर येथे घडली.शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.दोन दिवसांपूर्वीच मोबाईलचे दुकानफोडून अज्ञात चोरट्यांनी
सुमारे तीन लाखांचे मोबाईल चोरून नेले होते.
याबाबत माहिती अशी,की गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मी नगर येथील रहिवासी ईश्वर पंडित वंजारी हे काही दिवसांपासून जळगाव येथील महाबळ परिसरातील विवेक कॉलनी येथे राहत आहेत.काल (ता.६) सकाळी ईश्वर वंजारी यांचा मुलगा सौरभ हा एरंडोल येथील घरी आला व घराची साफसफाई करून घराला कुलूप लाऊन सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव येथील विवेक कॉलनी येथे आला.मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाट तोडून त्यामध्ये असलेले सुमारे तीन लाख रुपयांचे
सोन्याचे दागिने लंपास केले.
आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास या भागातील रहिवासी अजय सुकदेव मराठे यांना ईश्वर वंजारी यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले असून दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.अजय मराठे यांनी त्वरित जळगाव येथे ईश्वर वंजारी यांना मोबाईलवरून माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच ईश्वर वंजारी एरंडोल येथे आले असता त्यांना घराजवळ गर्दी दिसून आली.ईश्वर वंजारी यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील सर्व सामान अस्त्यावस्त पडला असल्याचे दिसून आले.
त्यांनी घरात असलेल्या सोन्याच्या वस्तूंची पाहणी केली असता त्यांना सोन्याच्या वस्तू सापडल्या नाहीत.अज्ञात चोरट्यांनी ३५ gram वजनाची पोत,वीस gram वजनाच्या बांगड्या,पंधरा gram व पाच gram वजनाची सोन्याची अंगठी व अन्य दागिने असा सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.ईश्वर वंजारी यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची बिले न सापडल्यामुळे पोलीस स्थानकात केवळ पाच gram वजनाच्या चोरीची नोंद करण्यात आली आहे.उर्वरित दागिन्यांचे बिले न सापडल्यामुळे त्याची नोंद करण्यात आलेली नाही.
दागिन्यांची बिले घरातच असून ते सापडल्यानंतर नोंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.याबाबत ईश्वर वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान शहरात दोनच दिवसांपूर्वी प्रमुख मार्गावरील शेतकी संघाच्या व्यापार संकुलातील मोबाईलच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीच्या १९ मोबाईलसह रोख रक्कम लंपास करण्यात आली होती.दोन दिवसात दोन मोठ्या चो-या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
हे पण वाचा
- नवीन वीज मीटर बसवण्यासाठी सहाय्यक अभियंत्याने मागितली साडेचार हजाराची लाच; संशयित लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
- दीड वर्षापासून प्रेमसंबंध, घरच्यांकडे लग्नासाठी मागणी,मुलीच्या आईने दिला सल्ला ‘आधी सेटल हो, मग लग्न कर’ रागात प्रियकराने प्रेयसीची केली हत्या अन् स्वतः ही केली आत्महत्या.
- एरंडोलला शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, युवासेनेच्या जिल्हा समन्वयकांसह माजी नगरसेवकासह अनेक पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश.
- गुरु शिष्याच्या नात्यास काळीमा! एरंडोल तालुक्यात शिक्षकाकडून शाळेतच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग.
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.