एरंडोलला शिवसेना ठाकरे गटाला खिंडार, युवासेनेच्या जिल्हा समन्वयकांसह माजी नगरसेवकासह अनेक पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश.

Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोलदादा पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील यांची होती उपस्थिती.

एरंडोल :- शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेनेचे शहरप्रमुख जयेश महाजन,शहर संघटक नितीन महाजन यांचेसह शेकडो शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अमोल पाटील यांचे उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश तालुक्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.

उबाठा ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन, उपतालुकाप्रमुख अनिल महाजन,माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेनेचे शहरप्रमुख जयेश महाजन,शहर संघटक नितीन महाजन यांचेसह राहुल माळी,भरत महाजन,राजेश महाजन,आबा नेरकर, सचिन महाजन,हिलाल माळी,हेमंत महाजन,लालू भेलसेकर, सागर महाजन या प्रमुख पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अमोलदादा पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील यांचे उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व पदाधिका-यांचे स्वागत करून सत्कार केला.आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिका-यांच्या प्रवेशास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.दरम्यान युवासेनेचे जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांचे पुत्र असून माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन यांचे पती आहेत. रुपेश माळी माजी नगरसेवक असून युवक कार्यकर्त्यांचे मोठे संघटन त्यांनी केले आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाल्याचे बोलले जात आहे.

यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिका-यांनी राजीनामे दिले असून ते देखील सत्ताधारी महायुतीतील एका प्रमुख पक्षात प्रवेश करण्यासाठी नियोजन करीत आहेत.विरोधी पक्षातील पदाधिका-यांना प्रवेश देतांना पक्षाच्या निष्ठावान पदाधिका-यांना विश्वासात घेतले जावे अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात विशेषत: आमदार अमोलदादा पाटील आणि माजी आमदार चिमणराव पाटील यांचे कार्यपद्धतीवर प्रचारसभांमध्ये अत्यंत आक्रमक शैलीत टीका करून गंभीर आरोप करणा-या प्रमुख पदाधिका-यांनी केवळ चारच महिन्यात आपल्या भूमिकेत बदल करून आजी,माजी आमदारांचे नेतृत्व मान्य केले आहे.शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिका-यांबद्दल तालुक्यातील राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

यांच्या झाला पक्ष प्रवेश

माजी आमदार चिमणरावजी पाटील व आमदार अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एरंडोल शहरातील शिवसेना(उबाठा) चे माजी नगरसेवक रुपेश माळी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, युवासेना उपतालुकाप्रमुख अनिल महाजन, युवासेना शहर संघटक नितीन महाजन, युवासेना वैद्यकीय आघाडी शहर प्रमुख राजेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते राहुल माळी, भरत महाजन, पंकज नेरकर, निहार भेलसेकर, अनिल महाजन, नाना वाणी, संजय महाजन, हिलाल माळी यांच्या सह सुमारे ४० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान यावेळी मा. ना. एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून स्वागत केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्याचे व शिवसेना संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केली. माजी आमदार चिमणरावजी पाटील यांच्या मार्गाने मार्गक्रमण करत एका बाजूने मतदारसंघात विकासाची घोडदौड तर दुसऱ्या बाजूने मजबूत पक्ष संघटन निर्माण करण्याचा मानस असल्याचे आमदार अमोलदादा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. आगामी काळात असे अनेक धक्के विरोधकांना देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी