नागपूर :- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोनिया मंडले ( 38 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर राजेश मंडले (45 वर्षे, मॉयल कॉलनी, छावणी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
काय घडले नेमके?
आरोपी राजेश मंडले हा बेरोजगार होता आणि त्याचे सोनियाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली. त्याची पत्नी दोन मुलांसह वेगळी राहू लागली. यानंतर राजेश याने सोनियाशी प्रेमविवाह केला. दोघांना 13 वर्षांची मुलगी आहे. सोनिया मोईल या कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. दोघांच्याही आयुष्याची सुरुवात छान चालली होती. मात्र यादरम्यान राजेशला कर्करोग झाल्याचे समोर आले. मागच्या तीन वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यावर उपचार करत होती. मात्र, दिवसेंदिवस हा आजार वाढत होता.
त्यामुळे चिडचिड निर्माण होऊन त्याचे सतत आपल्या पत्नीबरोबर भांडण होत होते.
घटनेच्या दिवशी रविवारी सकाळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा राग विकोपाला गेल्याने राजेशने पत्नी सोनियाच्या डोक्यात हातोड्याने वार करून तिची हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याची तेरा वर्षांची मुलगी उठली आणि तिने आईला हाक मारली. यावेळी काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे ती बेडरूममध्ये गेली.
यावेळी तिला तिचे वडील लटकलेले आणि आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर तिने मोठ्याने हंबरडा फोडला. तिची आवाज ऐकून शेजाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पर्वते आपल्या पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. या घटनेमुळे मॉईल कॉलनीत मोठी खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक