CCTV Video:हृदय पिळवटणारी घटना! धावती ट्रेन पकडण्याची चूक,पत्नी समोर पती व मुलगी पडले ट्रेनखाली पुढे जे घडले ते दुर्दैवी

Spread the love

CCTV Video: ट्रेनने प्रवास करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की बरेच लोक ट्रेन सुरू झाल्यावर धावत्या गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करतात. आजपर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना खाली पडून लोकांचा मृत्यू झाला आहे.
मात्र याचा कोणताही परिणाम इतर नागरिकांवर झालेला दिसत नाही. त्यामुळेच, याचे परिणाम काय होऊ शकता याची कल्पना असतानाही लोक या गोष्टी करतात. सध्या अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. ज्यात धावती ट्रेन पकडणं एका व्यक्तीला अतिशय महागात पडलं.

ही घटना राजस्थानमधून समोर आली आहे. ज्यात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न एका बाप-लेकीच्या जीवावर बेतला. आबूरोड रेल्वे स्टेशनवर भीमाराम नावाचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली होत्या.

या व्यक्तीने जवाई बांध येथे जाण्यासाठी तिकिट खरेदी केलं होतं. मात्र ट्रेन पकडण्यासाठी तो प्लॅटफॉर्मवर जाताच ट्रेन सुरू झाली. ट्रेन निघून जात असल्याचं पाहताच भीमरामसोबत त्याचं संपूर्ण कुटुंब धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू लागलं.
आधी भीमारामने आपली पहिली मुलगी रंजिकाला ट्रेनमध्ये बसवलं.

त्यानंतर त्याने आपल्यासोबत दुसरी मुलगी मोनिकालाही ट्रेनमध्ये चढवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तोपर्यंत ट्रेनने वेग पकडला होता. वेगाने धावणारी ट्रेन पकडणं अवघड होतं. हे समजल्याने भीमराम आपली मुलगी रंजिका हिला ट्रेनमधून परत आणायचा खाली उतरवायचा प्रयत्न करत होते, कारण आता ट्रेन पकडता येणार नाही हे त्यांना समजलं होतं.

मात्र, ट्रेनने वेग पकडताच भीमारामचा तोल गेला आणि ते आपल्या मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडले.हा अपघात पाहून पत्नी जागीच बेशुद्ध पडली. घाईघाईत ट्रेनही थांबवण्यात आली आणि बाप-लेकीला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार