Health Tips : चार असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.
Health Tips : माणसं वाढतं वय हे त्याच्या शरीर आणि त्वचेवर दिसायला लागतं. त्यामुळे हेल्दी डाएट फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला चार असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.
1) बीटाचा ज्यूस
आयर्नसाठी बीट हे फार चांगले फळ आहे. त्यासोबतच यात अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक रक्त निर्मिती करणे, त्वचा तजेलदार ठेवणे यासाठी या बीटाचा ज्यूस फार उपयोगी आहे.
2) मोसंबीचा ज्यूस
मोसंबीचा ज्यूस बाराही महिने मिळू शकतो. यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी ऑक्सीडेंट आढळतात. या तत्वांमुळे शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून सुरक्षा होते. मोसंबीचा ज्यूस रक्तीसाठीही चांगला असतो.
3) संत्र्याचा ज्यूस
संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस सामिल करा. या ज्यूसमुळे पचनक्रियाही चांगली होते.
4) डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबाच्या फायद्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. नेहमी आजारी पडल्यावर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं त्यामुळे याचा फायदा त्वचेला होतो. त्यासोबत याने रक्तही शुद्ध राहतं.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.
- बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.
- संतापजनक;रक्षकच बनला भक्षक! महिलादिनानिमित्त सत्काराला बोलावून पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार, नागरिकांमध्ये संताप.
- एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची केली हत्या; काय आहे प्रकरण व पोलिसांनी आरोपीच्या शोध कसा लावला, वाचा संपूर्ण बातमी.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिवादन; संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च आदर्श – मंत्री गुलाबराव पाटील