Viral Video: धोकादायक स्टंटचे व्हिडीओ तुम्ही नेहमीच सोशल मीडियावर पाहिले असणार. हे स्टंट कधीकधी इतके धोकादायक ठरतात की यामुळे एखादा व्यक्ती गंभीर जखमी होतो. तर अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत.पण असं असलं तरी देखील काही अशी अती उत्साही तरुण मंडळी आहेत, जी प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा काही फॉलोअर्ससाठी असे धोके पत्कारत असते. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे.
हा स्टंट अखेर फसला आहे. पण नशीबाने जीवीतहानी झालेली नाही. परंतू तरुण आणि तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हा व्हिडीओ स्वत: दिल्ली पोलिसांनी ट्वीट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी या कपलसोबत काय घडलं हे दाखवलं आहे. तसेच स्टंटबाजी करणं किती धोक्याचं ठरु शकतं हे देखील त्यांनी सांगितलं आहे.
दिल्ली पोलिसांनी ट्वीट करत लोकांना प्राणघातक अपघात टाळण्यासाठी “सुरक्षितपणे वाहन चालवण्यास” सांगितले. 28-सेकंदाच्या क्लिपमध्ये, जोडपे चालत्या बाईकवर एक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे,
ज्याचा परिणाम खूपच भयानक होतो. मुलगा आणि मुलगी दोघेही बाइकवरून पडले. दिल्ली पोलिसांनी व्हिडिओला एक उत्तम कॅप्शन देखील दिले आहे, ज्यामध्ये त्यांनी जब वी मेट मधील ये इश्क ही गाण्याचे बोल दिले आहेत. त्यात म्हटले आहे, “ये जोखिम है, बैठे बिठाये, हदियां तुडवाये.”
व्हिडीओच्या सुरुवातीला सर्वकाही ठिक सुरु असतं. त्यावेळेला तरुण आपली बाईक उचलतो आणि पुन्हा सरळ पण वाऱ्याच्या वेगाने गाडी पळवतो.
परंतु पुढच्या वेळेला मात्र त्याचा प्लान फसतो. तो गाडी पुढच्या चाकाने वर तर उचलतो परंतू पुन्हा खाली करता त्याला येत नाही. ज्यामुळे त्याच्या मागे बसलेली तरुणी खाली पडते आणि तरुणाचा देखील तोल जातो. हा खूपच धोकादायक आणि जीवावर बेतनारा स्टंट आहे. जो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील त्यावर कमेंट्स केल्या आहेत.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..