निंभोरा स्टेट बँक शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वारसास मिळाला लाभ

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वयाच्या 55 वर्षापर्यन्त कव्हर लाभ मिळतो, कोणत्याही कारणामुळे विमा धारकांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नाम निर्देशित व्यक्तीला दोन लाख रुपयांची मदत मिळते,अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.
18ते 50 वर्ष वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने चा वार्षिक प्रीमियम फक्त 330 रुपये आहे.


विमा धारकांचे मृत्यू सर्टिफिकेट व क्लेम फॉर्म जमा केल्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हक्काची रक्कम नाम निर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.
निंभोरा स्टेट बँक शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा धारक कुसुम दिलीप गाढे रा. रेंभोटा, ता.रावेर.यांच्या मृत्यू नंतर त्यांचे वारसास रेंभोटा येथील दिलीप डिगंबर गाढे यांना क्लेम दोन लाख रुपये चा चेक दस्तऐवज देण्यात आला.


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा क्लेम रक्कम चेक स्वरूपात दस्तऐवज दिलीप डिगंबर गाढे यांना देतांना निंभोरा स्टेट बँक शाखा प्रबंधक राधेश्याम मुंगमोळे, उपप्रबंधक सुनील बावस्कर.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार