विखरण येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्यामुळे 19 वर्षीय युवकाचा मृत्यू.

Spread the love

एरंडोल :- स्वत;च्या शेतातील शेततळ्यात पाय घसरून पडल्यामुळे विखरण (ता.एरंडोल) येथील एकोनावीस वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना
काल रात्री सात वाजेच्या सुमारास पिंपळकोठा शिवारात घडली.याबाबत माहिती अशी,की विखरण येथील तेजस रवींद्र अहिरे (वय-१९) हा युवक काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या पिंपळकोठा शिवारातील
शेतात गेला होता.शेतात असलेल्या शेततळ्याजवळ आला असता त्याचा पाय घसरल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तेजस अहिरे हा शेततळ्यात पडल्याचे समजताच परिसरातील शेतक-यांनी घटनास्थळी गर्दी केली. मयत तेजस अहिरे यांचा आतेभाऊ गुलाब निंबा सोनवणे यांना माहिती मिळताच त्यांनी सुनील सोनवणे,वसंत अहिरे, सुनील अहिरे,नाना पाटील,आनंद शिंदे यांचेसह शेतात गेले.ग्रामस्थांच्या मदतीने तेजस अहिरे यास शेततळ्यातून बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून तो मयत झाला असल्याचे सांगितले.

मयत तेजस अहिरे याचे वडील खासगी शाळेत शिपाई असून त्याचे पच्छात आई,वडील व बहिण असा परिवार आहे.याबाबत गुलाब निंबा सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार