आजचे राशीभविष्य, ( मंगळवार , ११ जुलै २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत. उगाचच बंधनात अडकून राहू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वृषभ :-

आर्थिक प्रश्न मिटतील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो. श्वसनाच्या विकारांपासून जपावे.

मिथुन :-

एकसूत्री विचार करावा. धरसोडपणे कामे करू नयेत. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे.

कर्क :-

मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. फसव्या लोकांपासून सावध राहावे. अति विचाराने थकवा जाणवेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

सिंह :-

तडजोडीला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. विचारांची दिशा बदलावी लागेल. तरुणांचे विचार जाणून घ्यावेत. नवीन ओळखी होतील.

कन्या :-

चिंतामुक्त जगावे. पत्नीच्या विचारांशी तडजोड करावी लागेल. अधिकारी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. मनातील कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो.

तूळ :-

दिवसभर कामात गुंग राहाल. आजचा दिवस लाभदायक असेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक कारणावरून चिडचिड संभवते. शेअर्सच्या कामात यश मिळेल.

वृश्चिक :-

उत्साह व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. जोडीदाराची इच्छा जाणून घ्यावी. घेतलेल्या मदतीची जाणीव ठेवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

धनू :-

जोडीदाराशी अनबन होऊ शकते. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील कुरबुरी शांततेने हाताळा. जमिनीच्या कामात यश येईल.

मकर :-

मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिकाराचा योग्य वापर करावा. काही धाडसी निर्णय घ्याल. मनातील मरगळ काढून टाकता येईल. करमणुकीत वेळ घालवावा.

कुंभ :-

बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. आपल्या मताप्रमाणे इतरांना वागायला लावाल. घरातील स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. आवडी-निवडी बाबत अधिक काटेकोर राहाल.

मीन :-

मुलांबरोबर वेळ व्यतीत कराल. मित्रांची वेळेवर मदत मिळेल. रागाला आवर घालावा लागेल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. तांत्रिक गोष्टीत रस घ्याल.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार