ऐन हंगामात नीम येथील शेतकऱ्याचा शेतात घडली दुर्दैवी घटना
प्रतिनिधी | अमळनेर
शेतातील वीज खांबाला तारांचा स्पर्श होऊन वीज प्रवाह उतरून विजेच्या जोरदार धक्क्याने निम येथील शेतकऱ्याचा बैल जागीच दगावला ,यात मात्र शेतकरी थोडक्यात बचावला असून घटना माहिती पडताच क्षणी अमळनेर व कळमसरे वीज वितरण कंपनीच्याअभियंता वर्गाने दिली घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने रोष कमी झाला ही घटना दुर्दैवी घटना ऐन हंगामात नीम येथील शेतकऱ्याचा शेतात घडली त्यात ५० हजार रुपयांचे पशुधन दगावल्याने शेतकऱ्याने हंबरडा फोडला त्याचे इतर शेतकऱ्यांनी सांत्वन केले
अमळनेर तालुक्यातील नीम येथील शेतकरी रोहिदास रामसिंग चौधरी यांचा शेतात आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास शेतीचे काम करीत असताना (कापसाची कोळपणी)करीत असताना स्वतः शेतमालक
पिकाची वखरणी करीत असताना पाऊस रिमझिम सुरू असल्याने महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलचा आर्थिग असलेल्या स्टे ला बैलाला स्पर्श झाला आणि क्षणार्धात बैल जागीच मृत्युमुखी पडला.यात शेतकरी बचावला असून याच दरम्यान कोळपणी साठी लागणारे शेतातील अवजारे हे जर लोखंडी असते तर कदाचित शेतकरी रोहिदास चौधरी यांनाही आपला जीव गमवावा लागला असता.असे देखील बोलले जात आहे.सद्या सर्वत्र पाऊस सुरू आहे.जमीन ओली असल्याने ते देखील जबरदस्त धक्क्याने बाजूला फेकले गेले.मात्र,सुदैवाने ते थोडक्यात बचावले.
एकीकडे सद्या सुगीचे दिवसात बैल मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांचे सुमारे ४०ते ५० हजारांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यावर असे अपघाती संकट ओढवल्याने आर्थिक कोंडीत ते सद्या सापडले आहेत.तरी,एम एस ई बी.ने त्या,शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती पाहता काहीतरी आर्थिक मदत करावी अशी परिसरातून मागणी होत आहे.
ही घटना माहिती पडताच कळमसरे उपकेंद्राचे विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता किशोर सुर्वे , अमळनेर ग्रामीण वीज वितरण कंपनीचे अभियंता मनोज पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून प्राथमिक अहवाल जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना पाठविला असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई पोटी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने रोष कमी झाला ,तरी उद्या जळगाव येथून टीम येवून पंचनामा करणार असल्याचे किशोर सुर्वे यांनी दिव्य मराठीकडे सांगितले
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक
.