सांगली :- जिल्ह्यात ऑनर किंलीगची घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणास वडिलांनी विरोध करत निर्घृण खून केल्याची घटना जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये शनिवारी घडली.
प्रेमप्रकरणास वडिलांचा असलेला विरोध आणि मुलगी सांगूनही ऐकत नाही, म्हणून चिडून वडिलांनीच खून केला. श्रेया संतोष जाधव (वय 17) असे मयत मुलीचे नाव आहे. संतोष जगन्नाथ जाधव, असे श्रेयाच्या वडिलांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध
मयत श्रेयाचे नात्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला वडिलांचा त्याला विरोध होता. त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते. त्यामुळे 1 जुलै रोजी शनिवारी श्रेया कॉलेजला जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र, वडिलांनी तिला संबंधित मुलाशी न भेटण्याची अट घातली होती. यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया, असे सांगितले. मात्र, श्रेया काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हती. यावरून वाद झाल्यानंतर वडिल संतोष यांनी रागाच्या भरात समोर असणारा भाजी चिरण्याचा चाकू घेऊन श्रेयावर हल्ला केला.
वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी मृत श्रेयाचे वडील संतोष जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक