चाळीसगाव उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांची धाडसी कार्यवाही.

Spread the love

भडगाव (जावेद शेख प्रतिनिधी) भडगाव हद्दीतील गिरणा नदी पात्रात वाळु मोठ्या प्रमाणात चोरी केल्याने मोठी कार्यवाही . चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत वडदे गावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या जेसीबी च्या सहाय्याने अवैध या डंपर तसेच ट्रक्टर भरून चोरी करून तिची वाहतूक करत आहेत.

तरी सदर ठिकाणी कायदेशीर कार्यवाही करणेकामी एक पथक तयार करुन सदर ठिकाणी गेलो असता आम्हाला गिरणा नदी पात्रात एका जेसीबीच्या सहाय्याने ट्रक्टर भरतांना दिसले व एक जेसीबी नदी काठावर साठा करून ठेवलेली वाळू डंपर मध्ये भरतांना दिसला तेव्हा आमची खात्री होताच आम्ही दिनांक १०/०७/२०२३ रोजी रात्री ११.५० वाजता छापा टाकला त्या ठिकाणी वाळूने भरलेले ४ ट्रक्टर, २ जेसीबी, १ डंपर व आरोपी १) परमेश्वर उदयसिंग राजपुत वय ४२ रा. महिंदळे, २) प्रदिप भाऊसाहेब पाटील- वय ३४, रा वडधे, ३) ज्ञानेश्वर मंगा सोनवणे वय २७ रा कोटली, ४) राहुल केशव महाजन वय २७ असे मिळून आले

त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आम्ही लखीचंद प्रकाश पाटील रा वढधे याचे सांगणेवरून वाळू चोरी करत आहोत, असे सांगीतल्याने सदर इसमांना व वाहनाना ताब्यात घेवून त्यांचे विरुद्ध पो ना.१४४o भगवान रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भडगांव पोलीस स्टेशनला गु.र.नं २०६/२०२३ भादवि कलम ३७९,१०९३४ व खान व खनिज अधिनियम १९५७ चे कलम २१(१), २९(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाहीत एकुण ८३,२४,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर पथकात आमचे सोबत १) सपोनि सागर ढिकले, २) पोना / राजेंद्र अनवराव निकम, ३) पोकों/३३८४ महेश अरविंद बागुल, ४) पो कॉ २८०३ विश्वास सुधाकर देवरे, ५) पोका /९०६ श्रीराम विठ्ठल कांगणे, ६) पो कॉ/ ७१५ राहुल राजेंद्र महाजन, ७) पो कॉ /४४७ समाधान पोपट पाटील, ८) पो कॉ / २०८ आशुतोष रमेश सोनवणे, ९) पो कॉ / २२४५ रविंद्र निंया बच्छे, १०) पो कॉ / ९६२२ नंदकिशोर शिवराम महाजन, ११) पो कॉ ३३६३ पवन कृष्णा पाटील, १२) पो कॉ /३०४१ विकास भिमराव पाटील, १३) पोना १४४० भगवान पाटील असे अधिकारी व अमलदार सहभागी असून

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. एम. राजकुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव श्री. रमेश चोपडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापुढे देखील अशा प्रकारची अवैध वाळु चोरी विरुध्द धडक कार्यवाही करण्यात येणार- असल्याचा मानस श्री. अभयसिंह देशमुख साहेब यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार