VIDEO : सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, १५ प्रवासी जखमी, मदत कार्य सुरू

Spread the love

नाशिक :- सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने झोडपले आहे त्यामुळे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अश्यातच सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळली. स्थानिकांनी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत १६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पहा व्हिडिओ :

राज्य परिवहन महामंडळाची बुलढाणा येथील खामगाव आगाराची बस मंगळवारी सप्तश्रृंगी गडावर रात्री उशिराने आली. बुधवारी सकाळी परतीच्या प्रवासाला लागली. घाट मार्गावरील गणपती वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळली. बसमध्ये साधारणत: ३२ प्रवासी होते. त्यातील १५ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने अद्याप मदत कार्य सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार