Viral Video: एका बॉयफ्रेंडवर दोन मुलींच्या जीव जडला, दोघांच्या वाद गेला टोकाला, भररस्त्यात दोघींची फ्री स्टाईल हाणामारी,पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. जगाच्या कोपऱ्यात झालेली कोणतीही घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते. अनेकदा हे व्हायरल व्हिडिओ असे काही भयानक असतात की पाहणाराही चक्रावून जातो.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये दोन मुली एका बॉयफ्रेंडसाठी भांडताना दिसत आहेत. या तरुणींचा हा वाद इतका टोकाला जातो की दोघींमध्येही भररस्त्यात मारामारी सुरू होते. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?……
सध्या सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी- ट्रेनमध्ये तर कधी विमानात महिलांमध्ये जुंपल्याचे दिसते. तर कधी कॉलेजच्या मुलींमध्ये राडा झाल्याचेही अनेक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुली भररस्त्यात मारामारी करताना दिसत आहेत. तर त्यांचे हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न एक तरुण करत आहे. मात्र या मुली इतक्या रागात आहेत की दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भरचौकात सुरू असलेला हा राडा पाहून लोकही चक्रावून गेले.

बॉयफ्रेंडवरुन पोरींमध्ये जुंपली…..
हा व्हायरल व्हिडिओ राजकोटमधील (Rajkot) सांगण्यात आले आहे. एका बॉयफ्रेंडसाठी या दोन्ही मुलीं भररस्त्यात भिडल्याचे दिसत आहे. दोघीही गुजराती भाषेत एकमेकींना सुणावत आहेत. एक मुलगी मोबाईल मागतेय पण दुसरी मुलगी काही देत नाही.. त्यामुळे दोघींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होते.

एकमेकींचे केस धरुन, तोंडावर ओरबाडत ह्या पोरी मारामारी केल्याची दिसतेय. एक तरुण ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करतोय.. मात्र त्यालाही त्या पोरी जुमानत नाहीत. इतकेच नव्हेतर भांडणातल्या तिसऱ्या मुलीने या तरुणालाही चोपल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोन्ही तरुणींना खडेबोल सुणावले आहेत. तर काही जणांनी बापरे! एका पोराला तीन- तीन गर्लफ्रेंड आहेत.. असे म्हणत खिल्ली उडवली आहे. @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार