एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- धुळे येथून जळगाव येथे भरधाव वेगाने जाणा-या बसने प्याजो रिक्षास जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली तर रिक्षाचालक व अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाले..या अपघातात दोन वर्षाचा मुलगा बचावला असून त्यास कोणतीही दुखापत झाली नाही.हा अपघात काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नवीन धारागीर गावाजवळ असलेल्या हॉटेल कृष्णा समोर झाला.याबाबत माहिती अशी,की शहरातील गांधीपुरा भागातील फारुख रमजान खाटिक हे पत्नी मुस्कानबी खाटिक हे आपल्या दोन वर्षाचा मुलासह धुळे येथे नातेवाईकाकडे साखरपुड्यासाठी गेले होते.
साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर ते एरंडोल येथे येत असतांना त्यांना एरंडोल बस न मिळाल्यामुळे खासगी वाहनाने पारोळा येथे आले.पारोळा येथून प्याजो रिक्षा क्रमांक एम.एच.१९ ए.एक्स.०२९१ ने एरंडोल येथे येत असतांना नवीन धारागीर गावाजवळ असलेल्या हॉटेल कृष्णा जवळ त्यांच्या रिक्षास धुळे येथून भरधाव वेगाने येणा-या धुळे जळगाव बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.३४५१ ने जोरदार धडक दिली.या अपघातात फारुख रमजान खाटिक रा. फकीरवाडा व त्यांची पत्नी मुस्कानबी खाटिक तसेच रिक्षाचालक इकबाल बशीर खाटिक व रिक्षातील प्रवासी गणेश शांताराम महाजन गंभीर जखमी झाले.
अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थ व हॉटेलमधील कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवलदार अकील मुजावर,किरण पाटील अपघातस्थळी जाऊन गंभीर जखमींना बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.कैलास पाटील डॉ.मुकेश चौधरी, डॉ.रोहित पुराणिक यांनी सर्व जखमीवर प्रथमोपचार करून जळगाव रवाना केले.
जळगाव सामान्य रुग्णालयात डॉक्टरानी तपासणी केल्यानंतर फारुख रमजान खाटिक यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर
प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले.
अपघाताची माहिती समजताच फारुख खाटिक यांचे नातेवाईक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी फारुख खाटिक,मुस्कानबी खाटिक व गणेश शांताराम महाजन रा धरणगाव हे प्रवासी ववप्याजो रिक्षा ड्रायव्हर इकबाल खाटिक हे जखमी अवस्थेत पडले होते तर दोन वर्षाच्या फैजान हा रडत होता.अपघातानंतर एस टी बस चालक फरार झाला. अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी बसचालक भरधाव वेगाने चालवत असल्याचे सांगितले.धुळे येथून साखरपुड्याचा कार्यक्रमास उपस्थित राहून घराकडे येत असताना घरापासून केवळ तीन किलोमीटरबअंतरावर अपघात होऊन फारुख खाटिक यांचा मृत्यू झाल्यामुळे फकीरवाडा परिसरात शोककळा पसरली.
याबाबत हमीद चिंधा दैवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार विकास देशमुख तपास करीत आहेत.
दरम्यान मयत फारुख चे वडील हे होमगार्ड आहेत आपल्या घराजवळ फारुख याचे इलेक्ट्रिक रिपेअरिंग दुकान आहे. बुधवार सायकांळी शोकाकुल वातावरणात फारुख रमजान खाटिक याचेवर अंतिम संस्कार करण्यात आले.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..