मुठभर शेंगदाणे गुळाच्या खड्यासह खाण्याचे ५ फायदे, आयर्न कमी-थकवा फार तर हा उपाय नक्की करा

Spread the love

Peanut and jaggery: A healthy combo that should be part of your diet गुळ शेंगदाणे खाण्याची जुनी रीत आपली तब्येत सहज सुधारु शकते.

‘भागदौड़ वाली जिंदगी रुकना मना है’ हे वाक्य आपण ऐकलच असेल. धावपळीच्या जीवनात जो थांबतो तो मागे राहतो. परंतु, यशाच्या मागे धावत असताना आपण, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पौष्टीक पदार्थांऐवजी आपण फास्ट फूड खाण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार निर्माण होतात. परंतु, फास्ट फूड ऐवजी असे अनेक पदार्थ आहे. जे हेल्दी पण आहेत, व आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.

आपण गावाकडच्या लोकांना गुळ आणि शेंगदाणे खाताना पाहिलं असेल. मुठभर शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी बिस्किटे आणि कुकीजच्या जागी गुळ शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला आहे. गुळ शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात? याबाबतीत त्यांनी माहिती दिली आहे

गुळ – शेंगदाणे खाण्याची योग्य पद्धत

Pic for Google

जर आपल्याला छोटी भूक लागली असेल तर, गुळ – शेंगदाणे खा. कारण शेंग्दाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. यासाठी मुठभर शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घालून ठेवा. व सकाळी गुळासोबत शेंगदाणे खा. यामुळे पोट भरलेले राहते, शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

शेंगदाण्यात आढळणारे घटक

Pic for Google

शेंगदाण्यात प्रथिनांसह, अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स, नियासिन, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 9 आणि पॅन्टोथेनिक ऍसिड सारखे अँटिऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

गुळात आढळणारे घटक

Pic for Google

गूळ शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. यासोबतच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, झिंक, प्रथिने, ब जीवनसत्व इत्यादी पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.

शेंगदाणे आणि गूळ खाण्याचे फायदे.

Pic for Google

रक्ताची कमतरता भासत नाही

बहुतांश महिलांना अॅनिमियाची समस्या भेडसावत असते. ज्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. अशा स्थितीत भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह आढळते. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची मात्रा पूर्ण होते.

अशक्तपणा दूर करते

Pic for Google

योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे अशक्तपणाचा सामना करावा लागतो. अशावेळी शेंगदाणे आणि गूळ खा. यामुळे शरीरात काम करण्याची उर्जा मिळेल.

बद्धकोष्ठता, ऍसिडिटीपासून आराम.

Pic for Google

शेंगदाणे आणि गूळ या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यासह गुळामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशियममुळे, आतड्यांचे स्नायू मजबूत होतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या संबंधित समस्या छळत नाही.

वजन कमी होते

Pic for Google

गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे अधिक काळ भूक लागत नाही. त्यातील गुणधर्म शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा देते, यासह प्रोटीन्समुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.

दात आणि हाडे मजबूत करते

Pic for Google

गुळ आणि शेंगदाण्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे, याचा फायदा दाट आणि हाडांना देखील होतो.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार