एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल:- नवीन गाडी घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये घेवून ये अशी मागणी करून विवाहितेचा मानसिक,शारीरिक छळ करून मारहाण केल्याच्या कारणावरून पती,सासू,सासरे,जेठ,जेठानी यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी,की मुल्लावाडा येथील रहिवासी सनोबर माजीद खान यांचा विवाह भुसावळ येथील माजिद्खान युनुसखान यांचेशी १७ एप्रिल २०१९ रोजी सितारामभाई नगर एरंडोल येथे झाला होता.
विवाह झाल्यानंतर काही दिवसातच पती माजिदखान युनुसखान,सासू बानोबी युनुस खान,सासरे युनुसखान
उस्मानखान,जेठ मोहसीन युनुसखान,जेठानी निकहत मोहसीनखान यांनी माहेरहून गाडी घेण्यासाठी चार रुपये घेवून ये अशी मागणी करून विवाहिता सनोबर
माजिदखान यांचा मानसिक शारीरिक छळ करून मारहाण केली व घराच्या बाहेर हाकलून दिले.सनोबर यांचे वडिल शेख रफिक शेख भिकन यांना फोन करून तुमच्या मुलीस घेवून जा असे सांगितले.मागील दोन वर्षांपासून सनोबर ह्या वडिलांकडेच राहत आहेत.
विवाहितेचा पती,सासू,सासरे,जेठ,जेठानी यांनी एरंडोल
येथे येवून आई,वडिलांना शिवीगाळ करून करून धमकी दिली.याबाबत सनोबर माजिद खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात पती,सासू,सासरे,जेठ, जेठानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार संतोष चौधरी तपास करीत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






