पब्जी गेममुळे सुरू झाली लव्ह स्टोरी,पाकिस्तानची सीमा हैदर भारत मध्ये येवून झाली सीमा ठाकूर, सचिनसाठी सीमाने आपला धर्म बदलून हिंदू झाली.

Spread the love

तिचे चार मुले ही झाली हिंदू, मुलांनाही घेतले सचिनने दत्तक.
नवी दिल्ली :
सध्या भारत आणि पाकिस्तानात सीमा हैदर आणि सचिन यांच्या अनोख्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु आहे. आपल्या नवऱ्याला सोडून पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर हीने आता भारतातच आपले प्राण जावे असे म्हटले आहे.
आपले नाव तिने बदलून ठाकूर असे केले आहे. तसेच आपला आणि मुलांचा धर्मही तिने बदलून त्यांना हिंदू केले आहे. पब्जी गेममुळे आपले सचिनशी सुत जुळले आहे. आता आपल्या पुन्हा पाकिस्ताना जायचे नाही. मला आणि माझ्या मुलांना पाकिस्तान पाठवू नका अशी विनंती तिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले आहे.

सीमा आणि सचिन यांच्या लव्ह स्टोरीने आता पाकिस्तान आणि भारतात मिडीयात चर्चेला उधाण आले आहे. सीमाने मिडीयाशी बोलताना सांगितले की आता मी ठकुराईन झाली आहे. माझे नाव सीमा सचिन ठाकूर आहे. पब्जी आमच्या जीवनात लवजी बनून आला आहे. त्याच्यामुळे मला सचिन सारखा प्रेमळ पती मिळाला आहे. अन्यथा पाकिस्तानात गुलामने माझे जीवनाला अगदी नर्क केले होते. आता मला भांगेत सिंदूर भरायला आवडते. मंगळसूत्र घालायला खूप आवडते. हे सर्व सचिनसाठी करायला मला खूपच आवडते.

पाकिस्तानात गेले तर छळ करुन मारतील…..
सीमा जेव्हा पासून पाकिस्तानातून पळून आली तेव्हापासून तिला भेटायला अनेक लोक तिच्या घरी येत आहेत. सीमा आणि तिचा प्रियकर सचिनला सर्वजण भेटू इच्छीत आहेत. यावेळी तिने पाकिस्तानात न जाण्याची कारणे देखील सांगितली आहेत. एक म्हणजे तिला सचिनपासून वेगळे व्हायचे नाही. ती त्यांना आपला पती मानत आहे. आणि उर्वरित आयुष्य त्याची पत्नी बनूनच आयुष्य काढायचे असे तिने ठरविले आहे. सीमाने म्हटले आहे की जर तिला आता पाकिस्तानात पाठविले तर तिला नॉर्मल नव्हे तर भयानक मृत्यू दिला जाईल.

सचिनबरोबर आनंदी आहे….
सीमा पुढे म्हणाली की आधी आपला एक पाय कापला जाईल. नंतर दुसरा पाय कापला जाईल. त्यानंतर एक हात कापला जाईल नंतर दुसरा हात कापला जाईल. अशा प्रकारे छळून करुन मला मारले जाईल असेही ती म्हणाली. मला असा मृत्यू नको मला भारताच कायम रहायचे आहे. पाकिस्तान ऐवजी मला भारतातच मृत्यू आला तर चांगले होईल असे तिचे म्हणणे आहे. भारतात येऊन मला मोकळा श्वास घ्यायला मिळत आहे. माझा पाकिस्तानी पती मला खूप त्रास द्यायचा, तर भारतात सचिन तिला प्राणापलिकडे प्रेम करीत आहे. मी सचिनबरोबर आनंदी आहे असे सीमा हीने म्हटले आहे.

सीमाने गुलाम हैदर बरोबर साल 2014 मध्ये लव्ह मॅरेज केले होते.
2019 मध्ये गुलाम नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला होता. तेथून तो सीमाला पैसेही पाठवत असे. पण 2019 नंतर तो घरी परतला नाही. दरम्यान, 2020 मध्ये सीमाने PUBG गेमद्वारे सचिनशी मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झाले आणि 10 मार्च रोजी ते नेपाळमध्ये भेटले. त्यादरम्यान दोघांनीही मंदिरात लग्न केल्याचा दावा सीमाने केला आहे. पण नंतर ते आपापल्या देशात परतले. पण सीमाला फक्त सचिनसोबत राहायचे होते. सचिनलाही सीमासोबत राहायचे होते. त्याने सीमाला आपल्या चारही मुलांसह तिला दत्तक घेण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर सीमाने भारतात येण्याचा निर्णय घेतला. 10 मे रोजी ती आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातील कराची शहरातून शारजाहला पोहोचली. त्यानंतर येथून विमानाने काठमांडूला पोहोचली नंतर खासगी वाहनाने काठमांडूहून पोखरा येथे पोहोचली.

13 मे रोजी भारतात दाखल…
त्यानंतर त्यांनी पोखरा येथून दिल्लीला जाण्यासाठी बस पकडली. सचिन वाटेत नोएडामध्ये तिची वाट पाहत होता. 13 मे रोजी सीमा 28 तासांनंतर नोएडाला पोहोचली. त्यानंतर सचिन तिला घेऊन राबुपुरा भागात गेला. याठिकाणी दोघांनीही भाड्याने घर घेतले आणि ते आरामात राहू लागले. मात्र पोलिसांना याची माहिती मिळाली आणि 4 जुलै रोजी सचिन आणि सीमा यांना अटक करण्यात आली. मात्र, दोघेही कोर्टातून जामिनावर सुटले आहेत. मात्र याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरूच आहे.

सीमा सतत सीएम योगी आदित्यनाथ यांना पाकिस्तानला न पाठवण्याचे आवाहन करत आहे. तिला सचिनसोबत भारतात राहायचे आहे. तिला पाकिस्तानात मारले जाईल. सीमाला पाकिस्तानात पाठवले जाते की इथेच राहू दिले जाते, हे येणारा काळच सांगेल.सीमाने सांगितले की, तिचे सचिनवर जितके प्रेम आहे तितकेच तिची मुलेही सचिनवर प्रेम करतात. ते सचिनला पापा म्हणून हाक मारतात. सचिनही त्यांच्यावर खूश आहे. यासोबतच सचिनच्या कुटुंबीयांनीही त्या मुलांना दत्तक घेतले आहे. सीमा म्हणाली, “मी माझा धर्म बदलला आहे आणि मुलांनीही. मी आणि माझी मुले आता मुस्लिमातून हिंदू झालो आहोत. माझे आणि सचिनचे नेपाळमध्ये लग्न झाले होते. पण लवकरच इथे कोर्ट मॅरेजही करणार आहोत.

गुलाम हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आवाहन…
दुसरीकडे, सीमाचा पहिला पती गुलाम हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची पत्नी सीमा आणि मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची विनंती केली आहे. तर सीमाचे म्हणणे आहे की, ती चार वर्षांपासून गुलामपासून वेगळी राहत आहे. लग्नानंतर तो तिला मारहाण करायचा. अनेकवेळा त्याने तिच्या चेहऱ्यावर तिखटही फेकले. तिला त्याच्यासोबत अजिबात रहायचं नाही. आता या याप्रकरणात पुढे काय घडते हे पाहणे महत्वाचे आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार