विवाह समारंभात अनावश्यक खर्च टाळून नावदाम्पत्यने उचलला मुलांचा शैक्षणिक खर्च..

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी /. सतिष शिंदे सर

धरणगाव :- विवाह म्हंटला की बँड ,बाजा , बारात ची धूम आलीच . अलीकडच्या काळात विवाह सोहळा जवळ आला की बरीचशी मंडळी मोठ्या प्रमाणात देखणा सोहळा कसा होईल या कडे नक्कीच लक्ष देते. परंतु याला धरणगाव शहरातील ‘ कढरे ‘ कुटुंबियांनी आदर्श विवाह संपन्न करत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. धरणगाव शहरातील राहिवासी विलास कढरे हे भारतीय पश्चिम रेल्वे मध्ये कार्यरत आहेत . काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह सोनाली थोरात गिधाडे ता शिरपूर यांच्या सोबत बोद्ध पध्दतीने धरणगाव येथे संपन्न झाला . दोघही कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे पाईक असून महापुरुषांच्या विचारांचा आदर्श मानतात.

आपले समाजाच्या प्रति काही देणं लागतं या उद्देशाने विलास कढरे यांनी तालुक्यातील गरजू 20 मुलां मुलींना शैक्षणिक साहित्य घेत विविध ठिकाणी मराठी शाळांमध्ये सुपूर्द करणार आहेत.येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आवश्यक विद्यार्थ्यांना हे साहित्य पोच केले जाणार असून आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे . शिवाय विवाहि समारंभ मध्ये ‘ विद्रोही बुक स्टोल ‘ भुसावळ यांना विशेषतः आमंत्रित केल्याने या वेळी शेकडो पुस्तक विक्री झाले.

सर्व विविध वैचारिक संघटनेचे राज्य , जिल्हा , व तालुका प्रतिनिधी शुभेच्छा देताना

विवाह प्रसंगी सुमित्रअहिरे ( राज्य कार्य अध्यक्ष बामसेफ ) मा दीपक वाघमारे (मा. उपनगर अध्यक्ष न. पा. धरणगाव) राजेंद्र वाघ ( जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा )रमेश राजाराम पाटील (सरपंच कल्याने)एल बी सिंह (ट्राफिक इन्स्पेक्टर प. रेल्वे अमळनेर) गुलाबराव वाघ (जिल्हा अध्यक्ष शिवसेना) संजय महाजन (जिल्हा अध्यक्ष ओ बी सी सेल भाजपा ) कल्पना गरीबदास अहिरे (संचालिका शेतकी संघ धरणगाव) सुनील चौधरी (समाजसेवक धरणगाव) मोहन शिंदे (प्रदेश महासचिव भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र) लक्ष्मण पाटील (संभाजी ब्रिगेड – सामाजिक ) संजीवकुमार सोनवणे (मुख्याध्यापक पी आर हायस्कूल धरणगाव ) गौतम गजरे (भा मु मोर्चा ) व मोठ्या प्रमाणावर सामाजिक , राजकिय , अधिकारी मित्रपरिवार आदी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नावदाम्पत्यास शुभेच्छा देत नवीन चांगल्या व सामाजिक प्रगती साठीच्या संकल्पना रुजवाव्या या साठी प्रोत्साहन दिले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार