Viral Video:लोकल नव्हे बायकांची युद्धभूमी! लोकल ट्रेन मध्ये कधीच पाहिलं नसेल अशी बायकांची चप्पला, बुक्क्यांनी हाणामारी पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: आजवर ज्यांनी मुंबई लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण काही वेळा मुद्दा जुनाच असला तरी त्याची तीव्रता बघून थक्क व्हायला होतं.
आता बघा ना एरवी तुम्ही आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांना एकमेकींवर शाब्दिक कुरघोड्या करताना पाहिले असेल.

अगदीच प्रमाणाच्या बाहेर गेलं तर मग या बायका हमरीतुमरी सोडून हाणामारीवर सुद्धा उतरतात. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सुरुवातच मुळात एकमेकींना चप्पलेने मारण्यापासून झाली आहे. बरं व्हिडीओ जसा पुढे जातो तसे या महिलांचे आणखीनच रौद्र रूप पाहायला मिळते. हे सगळं बघताना आमची मुंबई लोकल बरी असेही तुम्ही म्हणाल. काय आहे हा प्रकार चला पाहूया.

@Ayushihihaha ने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या लेडीज कोचमध्ये घडलेली एक भीतीदायक घटना पाहायला मिळत आहे. फुटेजमध्ये गोंधळ सुरु आहे. एक महिला अक्षरशः बुक्के आणि चप्पल वापरूनदुसऱ्या महिलेला मारताना दिसत आहे. इतर महिला यामध्ये घाबरतच हस्तक्षेप करायचा प्रयत्न करत आहेत. त्यात भरीस भर म्हणून, लढाईतील दुसरी महिला तिच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलालाही चप्पल मारताना दिसून येते.
Video:

लोकल नव्हे बायकांची युद्धभूमी!
दरम्यान, प्रथमदर्शनी हा व्हिडीओ मुंबईच्या लोकलमधील असेल असे तुम्हालाही वाटू शकते पण मुळात हा कोलकाता मधील व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य महिलेच्या बोलीवरून सुद्धा हा बंगालचा व्हिडीओ असावा असे स्पष्ट होते. अनेकांनी यावर कमेंट करून मुंबई लोकल बरी असे म्हटले आहे. तर काहींनी यावरून मुंबई लोकलमध्ये तर एका मुलीचा अक्षरशः भांडणात जीव गेला होता या घटनेची आठवण करून दिली आहे. काहींनी महिलांच्या डब्यातच अशी भांडणे होतात पुरुष बिचारे शांत असतात असेही कमेंटमध्ये लिहिले आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार