दुकानावर जावून येते असे सांगून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता. अज्ञातच्या विरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

अमळनेर:- तालुक्यातील एका गावातील येथील १६ वर्षीय तरुणीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावातील १५ वर्ष ११ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी दिनांक १२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानात जावून येते असे सांगून घरातून निघाली.

मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने तिचा शोध घेतला असता मिळून आली नाही. नातेवाईकांकडे व जवळच्या परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने मुलीच्या वडिलांनी मारवड पोलिसांत अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार