घराच्या ओट्यावर बसलेले ६० वर्षीय वृद्धास पुतण्या कडून मारहाण,आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील ६० वर्षीय इसमाला त्याच्या पुतण्याने दारूच्या नशेत विटेने मारहाण केली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महादू शिवराम कोळी (वय ६०) रा. प्र. डांगरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ७:३० वाजता फिर्यादी घराच्या ओट्यावर बसले असताना त्यांचा पुतण्या विलास सोनू कोळी हा दारूच्या नशेत आला व फिर्यादीस खाली ओढून शिवीगाळ करत विटेने नाकावर, तोंडावर, मारहाण करून गंभीर दुखापत केली.

तसेच फिर्यादीच्या पत्नी, मुली आणि बहिणीस अश्लील शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी फिर्यादीला दिली. फिर्यादी गंभीर जखमी झाल्याने त्यास कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार झाल्यानंतर त्यांनी मारवड पोलीसात तक्रार दिली असून विलास सोनू कोळी याच्या विरुद्ध भादवि कलम ३२६, ३२४, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार