कमिशनचे पैसे दिले नाही म्हणून लाकडीकाठी व शिंगाड्याने बापलेकास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल.

Spread the love

अमळनेर:- कमिशनचे पैसे दिले नाही म्हणून तालुक्यातील अमळगाव येथे चार जणांनी घरात घुसून बापलेकास मारहाण केली असून याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
फिर्यादी दशरथ विश्वास पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ११ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्याचे वडील विश्वास पवार हे घरात गप्पा गोष्टी करत असताना बन्सीलाल धाकु पारधी, त्याची मुले आकाश, विकास व पुतण्या नितीन हे घरात घुसून शिवीगाळ करू लागले.

शेतीच्या व्यवहार केला मात्र आम्हाला कमिशन दिले नाही असे म्हणत फिर्यादी व त्याच्या वडिलांना लाकडी काठी व शिंगाड्याने मारहाण करू लागले. यात फिर्यादीच्या कमरेला, पायाला व त्याच्या वडिलांच्या डाव्या हाताला मार लागला असून वरील चारही जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. मारवड पोलिसांत भादवि कलम ३२४, ४५२, ४२७, ५०४, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे. कॉ. संजय पाटील हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार