Viral Video: एक सापास रुपयाची अडचण आली की काय? तो घुसला चक्क ATM मध्ये पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: सोशल मीडियावर सापाचे याने व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडिओ पहाणाऱ्यांना थक्क करून सोडतात, तर काही व्हिडिओ अंगाला काटा आणतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
विचार करा, की तुम्ही ATM मध्ये पैसे काढायला गेला आहात, पण तिथे एक मोठा साप दबा धरून बसला आहे, तर काय होईल? हा विचार करूनच तुम्हाला घाम फुटला असेल, पण ही सत्य घटना असून, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एटीएममध्ये घुसला साप……
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. हा व्हिडिओ पाहून कोणताही माणूस भीतीने थरथर कापू लागेल.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ATM मशीनवर एक मोठा साप सरसर वर चढत जातो, मशीनच्या स्क्रीनवर रेंगाळत असताना हा साप एटीएमच्या वरच्या भागापर्यंत पोहोचतो. त्यानंतर तो साप ATM मशीनच्या वरील भागावर केलेल्या छिद्राच्या आत घुसतो. थोड्या वेळाने तो साप त्या छिद्रात पूर्णपणे जातो. हे दृश्य इतकं भीषण आहे की कुणाच्याही अंगावर शहारे येईल.

मुळात हा व्हिडिओ खूप भयानक जरी असला तरी त्यावर कमेंट खूप मजेशीर येत आहेत. सापाला देखील पैसाची गरज लागली असेल असे यूजर्स म्हणत आहे.

https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1677696403806773248?ref_src=twsrc

हा व्हिडिओ ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओसोबत मजेशीर कॅप्शनमध्ये लिहिले आहे- सापांनाही पैशाची गरज असते का? लोक व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. मजेशीर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – होय नागमणी खरेदी करण्यासाठी.

हे पण वाचा


टीम झुंजार