मेरठ (उत्तर प्रदेश):- मध्ये हाय टेंशन लाइनच्या संपर्कात आल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. हरिद्वारहून कावड घेवून आलेल्या भक्तांचा डीजे विजेच्या हाय टेंशन लाइनला धडकला.ज्यामध्ये ६ भक्तांचा दुर्देवी मृत्यू झाला. या विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या भक्तांची संख्या डझनभर आहे. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी रस्त्यावर आक्रोश करत रस्त्यावर ठाण मांडली. मृत भाविकांच्या सहकार्यांनी आणि नातेवाईकांनी या घटनेसाठी विद्युत विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले.
या विषयी अधिक माहिती अशी की, मेरठ च्या राली चौहान गावात कावडधारी भावीक शनिवारी रात्री ८ वाजता गावात कावड घेवून पोहोचले. डीजेच्या ठेक्यावर नृत्य करत कावडयात्री जेंव्हा गावात पोहोचले, तेंव्हा खाली लटकत असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला डीजेचा स्पर्श झाला. यामुळे या विद्युत वाहिनीतील विद्युत प्रवाह सर्व डीजेच्या यंत्रणेमध्ये उतरला. त्यामुळे यावेळी जवळपास असलेल्या लोक एक-एक या पद्धतीने विद्युत झटका लागल्याने तडपडून कोसळू लागले.
यामुळे चारीही बाजुंनी आरडाओरड आणि गोंधळ उडाला. यावेळी कोणीतरी विद्युत विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर नागरिकांनी जखमी भाविकांना रूग्णालयात दाखल केले.गावातल्या तरूणांनी कावड यात्रेला जाताना महादेवाची अद्भूत प्रतिमा सोबत नेण्याचे ठरवले. सर्वांनी या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिला. या यात्रेत जवळपास २५ लोक सहभागी झाले. भगवान शंकराची फिरती प्रतिमा बनवून ती एका लोखंडी बोगीवर सजवण्यात आली. यावेळी सर्वांनी या प्रतिमेचे कौतूक देखील केले. यातील कोणीही हा विचार केला नसेल की, ज्या देवाची उल्हासित प्रतिमा घेवून ते ज्या देवनगरीला घेवून निघाले आहेत, तेथून आल्यावर त्यांच्या गावातच मृत्यूचे तांडव होईल.
यावेळी गाववाल्यांनी कावडला सजवून हरिव्दारला रवाना केले. शनिवारी जेंव्हा सगळ्या गावकऱ्यांना समजले की, त्यांचे कावडयात्रेकरू गावात यायला लागले आहेत. तेंव्हा सर्वजण कावडच्या स्वागतासाठी पोहोचले. बम बम भोलेच्या जयजयकारादरम्यान अचानक एक ठिणगी आणि भोलेनाथची ट्रॉली ढकलणार्या लोकांच्या शरीरातून धुर निघू लागला, तेंव्हा लोकांच्यात आरडाओरडा आणि किंकाळ्या सुरू झाल्या. जो पाहिल तो जीव वाचवून धावू लागला. जे जखमी झाले होते त्यांचे कुटुंबीय आपल्यांना वाचवण्यासाठी धडपडत होते, मात्र ते पुढे जाउ शकत नव्हते. मात्र यावेळी जळणाऱ्या लोकांच्या तोंडून निघणाऱ्या आर्त किंकाळ्या आणि धुरामुळे निर्माण झालेल्या भयावह दृष्याने सर्वजण भयभीत झाले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.