पती व दोन मुलांना सोडून पत्नी पळाली भाच्या सोबत,मुलांच्या आठवणीत चार महिन्यानंतर आली परत, पुढे काय झाले वाचा.

Spread the love

भागलपूर (बिहार ):- मधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एक महिला आपल्या भाच्याच्या प्रेमात पडली. मामीचं भाच्यावरील प्रेम इतकं डोक्यात गेलं की, सगळं सोडून ती त्याच्यासोबत पळून गेली.
भाच्याच्या प्रेमापोटी ती पती आणि दोन मुलांना सोडून पळून गेली. आता ती महिला आपल्या घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर तिने आता पती आणि मुलांसोबत राहणार असल्याचे सांगितले.
खरे तर, चार महिन्यांपूर्वी भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजच्या मिरहट्टी गावात राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. यानंतर भाच्याने तिला आयुष्यभर पत्नी म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले.

पतीने परतण्याची विनंती केली होती…
महिलेच्या पतीने तिचा खूप शोध घेतला. नंतर त्याला कळले की, ती त्याच्या भाच्याबरोबर पळून गेली. त्यानंतर पतीने पत्नीला फोन करुन घरी परतण्याची विनंती केली. त्याने आपल्या दोन मुलांकडे लक्ष दिले, परंतु आपल्या भाच्याच्या प्रेमात ती पुरती वेडी झाली होती.

मला माझ्या मुलाची आठवण आल्यावर मी घरी परतले….
इकडे चार महिन्यांनी जेव्हा मामीच्या डोक्यात प्रेमात पडण्याचा परमानंद शांत झाला तेव्हा तिला आपल्या मुलाची आठवण येऊ लागली. यानंतर ती आपल्या पतीच्या घरी परतली. घरी परतल्यानंतर तिच्या पतीने तिला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर तिला घरातही प्रवेश दिला नाही. त्यानंतर पत्नीने हाय व्होल्टेज ड्रामा केला. तिने पतीच्या घरासमोर मोठा गोंधळ घातला. महिलेने सांगितले की, ती कोणाशीही पळून गेली नसून ती स्वत:च्या इच्छेने फिरायला गेली होती. हे माझेही घर आहे. मी कोणत्याही परिस्थितीत येथून जाणार नाही.

पतीने साथ देण्यास नकार दिला…
इकडे गावातील लोक नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की, ती परत आल्यानंतर तिला स्वीकार. ज्येष्ठ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मुले आणि कुटुंबाचा हवाला देत पत्नीला परत स्वीकारण्यासाठी पतीला राजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. येथे पतीने पत्नीला परत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की, जी स्त्री घराची मान-मर्यादा विसरली तिला मी स्वीकारु शकत नाही. जिला स्वतःच्या मुलांच्या काळजी नाही तिला मी कसं स्वीकारु ते तुम्हीच सांगा.

हे पण वाचा

टीम झुंजार