तिच्या नातेवाईकाने पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्याचा केला प्रयत्न परंतु पतीने पाय धरून पाण्यात ओढून तिला बुडविले.
सोलापूर: दारूच्या नशेत पतीने किरकोळ भांडणातून पत्नीला शेतातील विहिरीत ढकलून जीवे ठार मारले आणि नंतर स्वतः त्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार सांगोला तालुक्यातील घेरडी-मेटकरवाडी येथे घडला.सिध्दाराम सुभाष कारंडे (वय २८) आणि सोनाली सिध्दाराम कारंडे (वय २५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे त्यांच्या तिन्ही चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत.
त्यांच्या नात्यातील लक्ष्मण बाळू आलदर यांनी यासंदर्भात सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सुभाष कारंडे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.मृत सिध्दाराम यास दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी पत्नी सोनाली हिला त्रास द्यायचा. नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत त्याने शेतात पत्नीशी भांडण काढले. तुला जिवंत सोडणार नाही असे ओरडत त्याने सोनाली हिला ढकलत विहिरीजवळ नेले आणि विहिरीत ढकलून दिले.
हा प्रकार पाहून धावत आलेल्या लक्ष्मण आलदर यांनी विहिरीत स्वतःला झोकून देत पाण्यात बुडणा-या सोनाली हिला वाचवत पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला असतानाच सिध्दाराम याने विहिरीत उडी मारली आणि सोनालीचा पाय धरून पाण्यात ओढून पाण्यात बुडविले. यात तिचा मृत्यू झाला. नंतर सिध्दाराम यानेही आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.