प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल:- तालुक्यातील कढोली येथील 17 वर्षे 3 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवुन नेल्याची घटना दि 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे शेतीच्या व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. दि.०२/०३/२०२२ रोजी आई-वडील हे नेहमी प्रमाणे शेतातुन घरी आले असता अल्पवयीन मुलीने स्वयंपाक करून घरात बसली होती नंतर रात्री ०८.०० वा. संडासला जाते असे सांगुन गेली.
आई वडिलांनी बराच वेळ झाले तरी मुलगी ही घरी परत आली नाही म्हनून मुलगा व त्याच्या मावस भाऊ यानी तिला आजुबाजुला शेतात, धरणाकडे तसेच नागाइ जोगाइ मंदीराकडे रात्री ११.००वा.जे पावेतो तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही तसेच नातेवाईकांना फोन करून विचारपुस केली असता मुलीची काहीएक माहीती मिळाली नाही. म्हणून आईस खात्री झाली की अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमीष दाखवून फुस लावून पळवून नेली आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अज्ञात इसमाच्या विरोधात भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार राजेश बुधा पाटील हे पुढील तपास करीत आहे.







