एरंडोल येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनुसूचित जातीच्या महिला कर्मचारीचा जातीय द्वेष भावनेतून छळ

Spread the love

अन्याय अत्याचार जेथे गंभीर ! तेथे शासकीय दक्षता समिती खंबीर !!

एरंडोल l प्रतिनिधी – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथील श्री.नारायण शंकर सरनाईक ( ‌ इले . मॅक शिक्षक ) यांचे विरुद्ध तसेच संबंधित दोषीं विरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होवून कारवाई होणे साठी, एरंडोल म.पो.निरिक्षक सो.पो. स्टे. यांना उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती च्या वतीने निवेदन सादर करण्यात आलेले आहे.
सदरचे निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे मयत वडीलांच्या जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गातील ‘ महीला कर्मचारी यांची शिपाई पदावर ‘अनुकंपा ‘ तत्वाखाली दिनांक ०५/०७/२०१९ पासून करण्यात आलेली आहे. त्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे कार्यरत आहेत.

नियुक्ती झाल्यापासून त्यांना नेमलेले काम विना तक्रारी करीत असताना मात्र सदर संस्थेत मुलीचा नामें -श्री. नारायण शंकर सरनाईक ( इले . मॅक शिक्षक) हजर हजर झाल्यापासून सन २०२० पासून सतत जाणीव व त्रास देत आहे. वाईट नजरेने बघणे, अशिल वर्तन करणे , विद्यार्थ्यांना भडकविणे, शिवीगाळ करणे, लज्जा निर्माण होवून मानहानी असे गलिच्छ शब्द वापरणे अशा प्रमाणे जाणीव पूर्वक जातीय द्वेष भावनेने सदर अनुसूचित जाती च्या महीला कर्मचारी यांना मानसिक त्रास देत आहे.

श्री.सरनाईक एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना भडकवून वर्गात घाण करण्याची चिथावणी देऊन करत आहे. दिनांक १६/०६/२०२२ रोजी कारण नसताना अपमानास्पद वागणूक देऊ कारण नसताना कर्मचाऱ्यांंसमोर शिवीगाळ केली.
‌वरिल सर्व बाबी सदरहू निवेदनासोबत कर्मचारी यांच्याकडे अर्जानुसार यांना जातीय द्वेष भावनेतून पापी नजरेतून श्री सरनाईक देत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तरी पुढील अनुचित प्रकार घडू नये करिता श्री सरनाईक तसेच इतर दोषी विरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी. अन्यथा नाईलाजास्तव आपल्या एरंडोल पोलीस स्टेशन चे दालनात दिनांक २६/०७/२०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजेपासून सर्व समाज बांधव तर्फे तीव्र धरणे निदर्शने आंदोलन करण्यात येईल . यानंतर सुद्धा गुन्हा दाखल न झाल्यास नाईलाजास्तव आपल्या एरंडोल पोलीस स्टेशन चे दालनात दिनांक १४/०८२०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजेपासून ‘ बेमुदत उपोषण ‘ करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी.सोबत महिला कर्मचारी यांच्या लेखी तक्रारी अर्ज सोबत जोडलेला आहे.

माहिती व पुढील कार्यवाहीसाठी १) म गृहमंत्री सो. महाराष्ट्र राज्य मुंबई 32 २) म. केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब बांद्रा ३) म. जिल्हाधिकारी सो. जळगाव ४) म जिल्हा पोलिस अधीक्षक सो.जळगाव , जिल्हा जळगाव ५) म डि.वाय.एस.पी.अमळनेर भाग अमळनेर ६) म तहसीलदार सो एरंडोल ७) उपविभागीय अधिकारी सो एरंडोल भाग एरंडोल ८) प्राचार्य सो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल ( शेतकी संघ जवळ) जिल्हा जळगाव यांना सादर रवाना सदर निवेदनावर उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य यांच्या सह्या आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार