एटीएम मशीन खोलून त्यातील 17 लाख 55 हजार रुपयाची चोरी प्रकरणी दोघांना अटक.

Spread the love

एक संशयित आरोपी हा बॅंकेत नोकरीला असल्याने त्यास एटीएमची होती माहिती,एटीएम मशीनचा पासवर्ड स्पाय कॅमेराच्या रेकॉर्डींगमधून बघून उघडले.
इंदापूर :- बस स्थानकातील एटीएम मशीनमधून १७ लाख ५५ हजारांची चोरी केल्याप्रकरणी पंजाबमधील दोघांना इंदापूर पोलिसांनी दौंड येथून अटक केली.
इंदापूर :- इंदापूर बस स्थानकातील एटीएम मशीनमधून १७ लाख ५५ हजारांची चोरी केल्याप्रकरणी पंजाबमधील दोघांना इंदापूर पोलिसांनी दौंड येथून अटक केली.
रचपाल बलदेव सिंह (वय ३६, रा. बाबा दिपसिंग नगर रोड नं.१, भंटिडा, पंजाब) व लखवीर बलदेव सिंह, (वय २९, रा. रायखाना, ता. तलवंडी सापो, जि. भटिंडा, राज्य-पंजाब) अशी त्यांची नावे आहेत.

८ जून ते १२ जून २०२३ दरम्यान इंदापूर बस स्थानकातील टाटा इंडिकॅश एटीएममधून १७ लाख ५५ हजारांची चोरी झाल्याची तक्रार इंदापूर पोलिसात दाखल झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. एटीएममधील सीसीटिव्ही बंद असल्याने व त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने चोरी झाल्याची निश्चित वेळ पोलिसांना समजत नव्हती. त्यामुळे तपासामध्ये अडथळे येत होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इंदापूरसह दौंड, शिक्रापूर, रांजणगाव, उरुळी कांचन परिसरातील अनेक सीसीटिव्हींचे फुटेज तपासले होते.

संशयित बॅंकेत नोकरीला असल्याने एटीएमची माहिती….
गुन्ह्यातील संशयित रचपाल सिंह हा पूर्वी बँकेत नोकरी करत होता. त्यामुळे त्याला एटीएम मशीनबाबत माहिती होती. आरोपींनी एटीएम मशीन खोलून त्यामध्ये पैसे भरण्याच्या कॅसेट जवळ स्पाय कॅमेरा बसवून एटीएम मशीनचा पासवर्ड स्पाय कॅमेराच्या रेकॉर्डींगमधून बघून त्यानंतर एटीएम मशीन उघडून त्यातील सर्व पैसे लंपास केले होते. त्यांनी यापूर्वी सुपे (बारामती), तळेगाव (पुणे), गोवंडी (मुंबई), गंगापूर (राजस्थान), कोटा (राजस्थान),पठाणकोट (पंजाब), उत्तराखंड राज्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पुणे ग्रामीणची कारवाई..
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि दिलीप पवार, स. पो. निरीक्षक योगेश लंगुटे, सहा. फौजदार प्रकाश माने, पो.ह. ज्ञानेश्वर जाधव, पो. नाईक सलमान खान, पो. कॉ नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड संग्राम माने यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास स.पो निरीक्षक योगेश लंगुटे हे करित आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार