भंडारा :- येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. बसस्थानकावर बसलेल्या अल्पवयीन मुलीला फसवून फिरायला नेलं.
त्यानंतर तिच्यावर सलग तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. भंडाऱ्यातील या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
नेमकं काय घडलं?…..
भंडाऱ्यातील 17 वर्षीय पीडितेचे कुटुंबीयांशी वाद झाल्यानंतर ती 29 जूनला दुपारी रागाच्या भरात घराबाहेर पडली. तिथून ती भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील बसस्थानकावर पोहचली. त्यानंतर तिने एसटीने भंडारा गाठलं. ती भंडारा येथील बस स्थानकावर बसली होती तेव्हा तिला दोन तरुणांनी हेरलं आणि दुचाकीवरून फिरायला नेलं. बरीच रात्र झाल्याचं सांगत तिला त्या तरुणांनी मित्राच्या रुमवर नेले. त्यानंतर तिच्यावर चार तरुणांनी सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी तिला 28 जून रोजी दुसऱ्या मित्राच्या रुमवर नेले आणि तिथेही तिच्यावर आणखी चार जणांनी सामूहिक अत्याचार केला.
त्यानंतर तिला त्यांनी भंडारा बस स्थानकावर सोडून दिलं. सदर पीडिता बस स्थानकावर एकटीच असल्याची बाब लक्षात येताच आणखी चार तरुणांनी तिला पुन्हा फसवून दुचाकीवर बसवून भंडाऱ्यातचं आणखी एका ठिकाणी नेत 29 जूनच्या रात्री सामूहिक अत्याचार केला. सलग 27, 28, 29 या तीन दिवसांत या पिडितेवर सामूहिक अत्याचार होत होते. 29 जून रोजी तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर तिला भंडारा बस स्थानकावर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर ही पीडिता 30 जूनला मुंबईत राहणाऱ्या तिच्या एका मित्राकडं रेल्वेनं निघून गेली.
दरम्यान, ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी अड्याळ पोलिसात दाखल केली होती. तिच्या मोबाईल लोकेशवरुन भंडारा पोलिसांनी तिला शोधून काढलं. तिची चौकशी केली असता, त्यात तिच्यावर भंडारा इथं सतत तीन दिवस नऊ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तिने पोलिसांना सांगितला.घटनास्थळं वेगवेगळी असल्याने भंडारा आणि अड्याळ अशा दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. भंडारा पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये पवन निखार (25), हितेश निनावे (26), करण खेताडे (26), निमोह उर्फ रॉनी कोटांगले (28), नितेश भोयर (30) या आरोपींचा समावेश आहे. तर अड्याळ पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये साहिल वाघमारे (22), विकास मानकर (24), शेबाज शेख (24), रवी बोरकर (22) या आरोपींचा समावेश आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……