Viral Video: धोकादायक स्टंटबाजी करण्याच्या नांदात झाला अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू; पहा धक्कादायक व्हिडिओ.

Spread the love

Viral Video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते.
स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांची भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या तरुणीसोबत घडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टंटबाजी करताना आजूबाजूला खूप गर्दी दिसत आहे. यात बरेच जण स्टंटबाजी करत आहेत. मात्र या तरुणींचा स्टंटबाजी करताना अपघात होतो. एक तरुणी बाईकचं पुढचं चाक वर उचलून स्टंटबाजी करतेय तर तिच्या मागे बसलेली मुलगी सेल्फी काढण्यात व्यस्थ आहे. अशातच समोरुन आणखी एक बाईकस्वार स्टंट करत येतो आणि त्याचा त्यांना धक्का लागतो आणि दोघीही पडतात.

मृत्यू झाल्याची शक्यता…….
यात दिसतं की पडल्यामुळे मागे बसलेल्या मुलीचे हातपाय थरथरत आहेत. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाल्यासारखं वाटतं. खतरनाक स्टंटबाजी करणं या दोन तरुणींच्या चांगलच अंगटल आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. काही जण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. या तरुणींनीही धोका पत्करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
पाहा व्हिडीओ

@momentoviral नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अशाप्रकारच्या अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही.

हे पण वाचा


टीम झुंजार