What Time To Eat Cashews Is Healthiest? काजू खाण्याचे काही फायदेही असतात, पण नेमके केव्हा खावे?
काजू हे एक हेल्दी ड्रायफ्रुट आहे. काजूचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. पदार्थात काजू घालताच, पदार्थाची चव दुपटीने वाढते. काजूमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात आढळतात.
काजूचा रोजच्या आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. फक्त आरोग्यच नाही तर, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. काजूतील पौष्टीक घटक शरीराला मिळावे यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी काजू खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस एक्स्पर्ट वरुण कत्याल यांनी रिकाम्या पोटी काजू खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम.

काजूच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते. काजूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. नियमित काजू खाल्ल्याने पचन संस्था निरोगी राहते. यासह पोटाच्या समस्याही कमी होतात. अशा स्थितीत नियमित सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ५ काजू खाणे हे एक चांगला पर्याय ठरू शकतो.
वजन नियंत्रणात ठेवते.

वजन कमी करण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरू शकते. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी काजू खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. व दिवसभर भूक लागत नाही. ज्यामुळे आपण उलट – सुलट खाणे टाळतो. अशा स्थितीत छोटी भूक भागवण्यासाठी ४ ते ५ काजू खा.
स्मरणशक्ती वाढते.

स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरू शकते. काजूमध्ये मॅग्नेशियम आढळते, ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करायची आहे, त्यांनी आपल्या आहारात काजूचा समावेश करावा.
हाडे मजबूत होतात

हाडे मजबूत करण्यासाठी काजू खूप उपयुक्त ठरू शकते. काजूमध्ये मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम देखील असते. जे हाडांची कमकुवतपणा दूर करते . नियमित काजूचे सेवन केल्याने हाडांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
हे वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.