आजचे राशीभविष्य, ( मंगळवार , १८ जुलै २०२३ )

Spread the love

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष :-

मानसिक ताण तणावापासून दूर राहावे. पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी. अचानक धनलाभ संभवतो.

वृषभ :-

अभ्यासूपणे काम करावे लागेल. कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी.

मिथुन :-

मनातील भावना उत्कृष्टपणे मांडाव्यात. हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. दिवसाची सुरुवात अनुकूल राहील.

कर्क :-

धरसोड वृत्ती टाळावी लागेल. कामाचा फार ताण घेऊ नका. विवेकाने केलेली कामे फळाला येतील. योग्य नियोजनावर भर द्यावी. मनोरंजन, मौजमजा करण्यात अधिक वेळ घालवाल.

सिंह :-

इतरांचा विश्वास संपादन कराल. प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हित शत्रू नरम होतील. घरात तुमचा वरचष्मा राहील.

कन्या :-

मनातील प्रेमभावनेत वाढ होईल. आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तूळ :-

कौटुंबिक वातावरणात रमाल. देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल. कफाचे विकार संभवतात. परिश्रमानंतर इच्छित फळ मिळेल.

वृश्चिक :-

तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. स्वत:च्या मनाप्रमाणे वागाल.

धनू :-

इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. नवीन बदल स्वीकारावे लागतील. मन काहीसे विचलित राहील. अंतर्गत विरोध होण्याची शक्यता. कामे विचारपूर्वक करावीत.

मकर :-

डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्‍यांना काही चांगले लाभ होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

कुंभ :-

जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा. आळस झटकून कामाला लागावे. अनाठायी खर्चाला आळा घालावा.

मीन :-

चुकीच्या संगती पासून दूर राहावे. स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा.

हेही वाचलंत का ?

टीम झुंजार