Top Foods for Calcium and Vitamin D : व्हिटामीनची कमतरता उद्भवल्यास थकवा येणं, मांसपेशी कमकुवत होणं, हाडं कमकुवत होणं अशा समस्या उद्भवतात.
व्हिटामीन -D ला सनशाईन व्हिटामीन (Sunshine Vitamin) असं म्हटलं जातं. कारण ते कोवळ्या उन्हापासून मिळते. व्हिटामीन डी शरीरातील कॅल्शियम शोषण्यास मदत करते. (How to get your vitamin D without sun) ज्यामुळे पुरेपूर कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचते. यामुळे हाडं मजबूत राहतात. व्हिटामीनची कमतरता उद्भवल्यास मांसपेशी कमकुवत होणं, हाडं कमकुवत होणं, अशक्तपणा, थकल्यासारखं वाटणं, अंगदूखी अशा समस्या उद्भवतात. (Natural Sources of Vitamin D and Calcium) पावसाळ्याच्या दिवसात उन व्यवस्थित येत नाही. परिणामी लोकांमध्ये व्हिटामी-डी ची कमतरता उद्भवते आणि आजारी पडण्याचं प्रमाणही वाढतं. रोजच्या आहारात ५ पदार्थांचा समावेश केला तर व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढता येऊ शकते.

1) मशरूमध्ये व्हिटामीन भरपूर प्रमाणात असते. आहारात मशरूमचा समावेश केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता दूर होण्यास मदत होते. यामुळे हाडं मजबूत राहतात. मशरूम उगवताना जी अल्ट्रावॉटलेट किरणं मिळालेली असतात त्यांच्यात व्हिटामीन डी चे प्रमाण अधिक असते.
2) पनीर व्हिटामीन डी चा चांगला स्त्रोत आहे. पनीर बनवण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतं की त्यात व्हिटामीन डी किती प्रमाणात असेल.
3) फोर्टिफाइड ऑरेंज ज्यूस, सोया मिल्क, दही आणि ओटमील हे व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत आहेत. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देखील घेऊ शकता.
4) केल किंवा पत्ताकोबी व्हिटामीन बी आणि डी चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. यात भरपूर पोषण मूल्य असतात. जे मेंदूच्या विकासास मदत करतात. याव्यतिरिक्त रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा सुधारते. केलमध्ये केम्फेरोल आणि क्वेरसेटिन असते. जे एक प्रकारचे एंटीऑक्सिडंट आहे. जे मेंदूच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते.
५) तज्ज्ञांच्यामते गाईच्या दूधात ११५ ते १२४ IU (International Unit) व्हिटामीन डी असते. १०० ग्राम तूपात जवळपास ६० IU व्हिटामीन डी आढळते. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी, टोफू, सोया दूध आणि सोया दही यासारख्या सोया उत्पादनांचा वापर करणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. या कारणास्तव, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते. शाकाहारी लोक या उत्पादनांचा वापर करून व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करू शकतात.
हे वाचलंत का ?
- Viral Video : सोशल मीडियावर रीलसाठी एका तरुणीच्या मूर्खपणा; भररेल्वेस्थानकात असे केले कृत्य लोकांना आला संताप, पहा व्हिडिओ
- शिपायाने दोघांच्या सोबतीने 7 वेळा विषारी इंजेक्शन देऊन केली पत्नीची हत्या; हत्येचे कारण ऐकून पोलीसही झालेत सुन्न.
- 30 हून अधिक विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करून 59 अश्लील व्हिडीओ केलेत पॉर्न साईटवर पोस्ट प्राध्यापकांचे घृणास्पद कृत्य, निनावी पत्रानं प्रकरण उघडकीस.
- भुसावळ तालुक्यात दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या,संशयित आरोपी पती फरार.
- चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय!