एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी शहरात सुरु असलेल्या सुमारे तीस कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करून काम लवकर पूर्ण करण्याची सुचना ठेकेदारास केली.तसेच संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीपुरा भागातील नवीन हनुमान मंदिर परिसरात उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.आमदार चिमणराव पाटील यांनी शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेवून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सुमारे तीस कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली.शहरातील नवीन वसाहतींमध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ठिकठीकाणी भेट देवून योजनेच्या कामाची पाहणी केली.
नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी उपाध्यक्ष अमोल पाटील यांची भेट घेवून पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे सर्वत्र चिखल झाला असून अनेक समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले.उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून नवीन वसाहतींमध्ये सर्वत्र चिखल झाल्यामुळे रस्त्यावर मुरूम अथवा खडीचा कच टाकण्याची सुचना पालिका प्रशासनास केली.तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याची सुचना ठेकेदारास केली. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाण्याची समस्या दूर होऊन नागरिकांना पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरातील नवीन वसाहतींमध्ये नवीन पाण्याच्या टाक्या प्रस्तावित असून पालिका कार्यालयाजवळ असलेल्या व जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून नवीन टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी अमोल पाटील यांनी पालिकेतर्फे सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली.स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन अमोल पाटील यांनी दिले.संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी गांधीपुरा भागातील नवीन हनुमान मंदिर
परिसरात उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सर्व पदाधिका-यांनी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.कार्यक्रमास पारोळ्याचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरसंघटक मयूर महाजन,ज्येष्ठ कवी प्रा.वा.ना.आंधळे,दिनेश घुगे,बापूराव पाटील,भूषण बडगुजर, प्रवीण पाटील,के.जी.नाईक, प्रवाराज पाटील,माजी नगरसेवक चिंतामणपाटील यांचेसह पदाधिकारी स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






