दोन लेकरांची आई प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली, पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्यासाठी चढली टॉवरवर,पुढे काय? झाले वाचा.

Spread the love

शिवपुरी (मध्य प्रदेश) :- ‘शोले’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटात अभिनेता धर्मेंद्र अभिनेत्री हेमा मालीनेचे प्रेम मिळवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतो. प्रेमाचा स्वीकार होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा तो घेतो.
असाच प्रकार मध्यप्रदेशीत घडला आहे. पण, येथे हिरो ठरलेय ती प्रेयसी. दोन लेकरांची आई प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली. प्रियकरासाठी ही विवाहित महिला थेट टॉवरवर चढली होती. तब्बल 3 तास तिचा हा ड्रामा सुरु होता.

पतीला सोडून प्रियकरासोबत रहायला मिळावे यासाठी या महिलेने हाय व्होल्टेज ड्रामा केला होता. अखेरीस तब्बल 4 तासानंतर ही महिलेला टॉवर वरुन खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. मात्र, विवाहीत महिलेचा हा प्रताप पाहून सर्वांनीच डोक्याला हात लावला. टॉवरवर चढलेल्या या महिलेला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

नेमका काय प्रकार घडला?…
मध्य प्रदेशातील शिवपुरीच्या मगरौनी चौकी भागातील पानघाटा गावात हा प्रकार घडला आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता ही महिला टॉवरवर चढली. महिलेने टॉवरवर चढून प्रियकराला बोलावण्याची मागणी केली. महिला टॉवरवर चढल्यानंतर तिला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. गावकऱ्यांकडून याची माहिती मिळताच मग्राउणी पोलीस आणि नायब तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. पोलिस आणि एसडीआरएफचे पथक या महिलेचे समुपदेशन करत तिला खाली उतरण्याची विनंती करत होते. प्रियकराला बोलावले तरच खाली टॉवरवरुन खाली येईल असे ही माहिला सांगत होती.

तब्बल चार तास सुरु होता ड्रामा

ही महिला विवाहीत असून तिला दोन मुल देखील आहेत. तिचा पतीसह वाद सुरु होता. यामुळे ती माहेरी राहत होती. तिचा एका तरुणासह प्रेमसंबध होते. टॉवरवर चढल्यानंतर ती प्रियकराला बोलवा असे सांगत होती. मला पतीसह रहायचे नाही. मला प्रियकरासोबत राहू द्या अशी अट तिने घातली. तिला बोलण्यात गुंतवुण पोलिस तिचे समुपदेशन करत होते. या महिलेच्या सुरेक्षेसाठी टॉवर भोवती जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मंगळवारी सकाळी सात वाजता ही महिला टॉवरवर चढली होती. तब्बल चार तास तिचा हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता. अखेरीस या महिलेला खाली उतरवण्यात यश आले.

हे पण वाचा

टीम झुंजार